Fake material produced in the name of Apple Company seized by the police esakal
नाशिक

Nashik Crime News : मोबाईल विक्रेत्यांकडून कंपन्यांचे बनावट साहित्याची विक्री सुरूच; साडेतीन लाखांचे बनावट साहित्य जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील मोबाईल मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम. जी. रोडवरील मोबाईल विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात नामांकित कंपन्यांच्या बनावट साहित्य आढळून आले. भद्रकाली पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करीत तब्बल साडेतीन लाखांचे बनावट साहित्य जप्त करीत संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कॉपीराइट उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एम.जी. रोडवर मोठ्याप्रमाणात मोबाईल ॲक्सेसरीज विक्रीची दुकाने आहेत. (Companies continue to sell fake materials from mobile sellers )

येथील काही विक्रेत्यांकडून नामांकित मोबाईल कंपन्यांच्या साहित्याची विक्री केली जात असल्याची तक्रार शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्याकडे करण्यात आली होती. उपायुक्त बच्छाव यांनी यासंदर्भातील कारवाई करण्याचे आदेश भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना दिले असता, त्यांच्या पथकाने सोमवारी (ता. १५) सायंकाळी धाडसत्र राबवून ३ लाख ५२ हजार ७०० रुपयांचे बनावट साहित्य जप्त केले. (latest marathi news)

श्री मॉजीसा मोबाईल ॲक्सेसरीज, ए. जी. एम कॉर्पोरेशन, श्री रिद्धी सिद्धी इम्पेक्स, श्री बालाजी, आशापुरा मोबाईल या विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी परप्रांतीय व स्थानिक विक्रेत्यांमध्ये वाद रंगला होता. त्यावेळीही परप्रांतीय मोबाईल साहित्य विक्रेत्यांनी मुजोरी करीत ग्राहकांनाही मारहाण केली होती. त्यामुळे येथील विक्रेत्यांची मुजोरी व अरेरावी ग्राहकांना नेहमीच त्रासदायक ठरत आली आहे. यापूर्वी ग्राहकांना मारहाण व दमदाटी केल्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने येथील विक्रेत्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune to Bangkok flight: गुड न्यूज! पुण्यातून बँकॉक अन् दुबई विमानसेवेला मंजुरी; 'या' तारखेपासून होणार उड्डाण

ReNew Company: नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेल्याच्या बातमीत किती तथ्य? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर

IND vs BAN: विराट आऊट... रोहित नाराज; मात्र चेन्नईचे चाहते सुस्साट, पाहा व्हिडिओ

Indian Billionaire: 32,615 कोटींची संपत्ती अन् देतोय 600 रुपये वाचवण्याचा सल्ला; कोण आहे हा उद्योगपती?

IPS Shivdeep Lande Resign: बिहारचे सिंघम शिवदीप लांडेंचा राजीनामा; प्रशासकीय वर्तुळामध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT