A police team with Jimmy Vipin Sharma, a suspected burglary suspect. esakal
नाशिक

Nashik Crime News : देवळा घरफोडीतील संशयिताला अटक! 3 दिवसांची कोठडी

Nashik News : देवळा येथील ज्ञानेश्‍वर नगरमध्ये (वाखारी रोड) मागील महिन्यात १८ जुलै रोजी भरदिवसा झालेल्या घरफोडीतील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात देवळा पोलिसांना यश आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील ज्ञानेश्‍वर नगरमध्ये (वाखारी रोड) मागील महिन्यात १८ जुलै रोजी भरदिवसा झालेल्या घरफोडीतील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात देवळा पोलिसांना यश आले असून, त्याला बुधवारी (ता. ३१) पहाटे चार वाजता नंदुरबार येथून अटक करण्यात आली. त्यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Nashik Crime News)

देवळा येथील ज्ञानेश्‍वर नगर (वाखारी रोड) परिसरात राहणारे आदेश बोअरवेलचे संचालक आदेश ठाकरे यांच्या बंगल्यात १८ जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास धाडसी घरफोडी झाली होती. यात रोख दीड लाख रुपये व १५ तोळे सोने असा सुमारे साडेसात लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरट्याने हडप केला होता. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

तसेच, तपासकामी नाशिकहुन फिंगर प्रिंट व डॉग पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांनी गोपनीय यंत्रणा सतर्क करून धुळे-नंदुरबार येथे यापूर्वी ते नेमणुकीस असताना अशाच प्रकारे चोरीच्या प्रकाराचा संदर्भ समोर ठेवत देवळा पोलिसांचे शोधपथक तयार केले.

चोरीच्या ठिकाणावरून सीसीटीव्ही फुटेज जमा करून आणि नंदुरबार येथील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी चाचपून पाहिले असता जिम्मी विपीन शर्मा (वय ३१) याचा चेहरा मिळताजुळता असल्याचे लक्षात आले. सदर आरोपी मूळचा हरियाणा राज्यातील असून, तो नंदुरबारला वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (latest marathi news)

या पथकाने नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचत व पाळत ठेवत जिम्मी विपीन शर्मा या संशयित आरोपीला बुधवारी (ता.३१) राहत्या घरातून ताब्यात घेतले. संशयित आरोपीने त्याच्याकडील मुद्देमालाची दिल्लीत विक्री केल्याची कबुली दिली. न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. धाडसी घरफोडी करणाऱ्या आरोपीला शोधण्यात देवळा पोलिसांना यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

संशयितावर ४१ गुन्हे दाखल

या गुन्ह्यातील संशयित आरोपीवर हरियाणासह नंदुरबार, धुळे, साक्री आदी ठिकाणी घरफोडी व चोरीचे ४१ गुन्हे दाखल आहेत. या तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक दामोदर काळे, पोलिस नाईक रवी बच्छाव, संदीप चौधरी यांचा सहभाग होता. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दामोदर काळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT