Nashik Dr. Rathi Attack esakal
नाशिक

Nashik Dr. Rathi Attack: राज्यात आणखी एक जीवघेणा हल्ला! नाशिकच्या डॉ. राठी यांच्यावर धारदार शस्त्रानं वार

Dr. Rathi Attack : हल्लेखोर हल्ल्यानंतर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : दिंडोरी रोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) रात्री नऊ ते साडेनऊदरम्यान घडली. अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉ. राठी जखमी झाले. (nashik crime suyog hospital dr rathi attack marathi news)

त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारार्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संकुल येथे डॉ. कैलास राठी यांचे सुयोग हॉस्पिटल आहे. शुक्रवारी रात्री राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील संशयित डॉ. राठी यांना भेटण्यासाठी आला.

त्या वेळी डॉ. राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले व काही वेळाने पुन्हा दुसऱ्या केबिनमध्ये दोघेही चर्चा करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी संशयित व डॉ. राठी यांच्यात शाब्दीक चकमक झाली. संशयिताने केबिनची कडी लावून धारदार कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर व मानेवर जवळपास १५ ते १८ वार केले.

डॉ. राठी यांच्या केबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ केबिनकडे धावत गेला. त्या वेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

संशयित हल्ल्यानंतर फरारी झाला असून, पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे. संशयिताने राठी यांच्यावर हल्ला का केला, याचे मुख्य कारण समजू शकले नाही. सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच त्यांच्या मित्र परिवाराने रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

संशयिताच्या शोधार्थ पथक रवाना

घटनास्थळावर परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानंतर हल्ला केलेल्या संशयिताच्या शोधार्थ पथक रवाना झाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुबई ट्रिप, कार, फ्लॅट अन्... बाबा सिद्दिकींना मारणाऱ्यांना काय आमिष दिलं होतं? तपासात धक्कादायक माहिती समोर

Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरूचा शनिदर्शनात ‘शॉर्टकट’; चौथऱ्याखालूनच हात जोडले

Out or not out? चिडके कुठचे! ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला नाबाद दिल्याने भारतीय खेळाडूंना धक्का, Video Viral

BJP Maharashtra Vidhansabha: भाजपचा तोफखाना आता महाराष्ट्रात; सुरु झाला झंझावाती प्रचार, कुठे कोण करणार प्रचार ?

Latest Maharashtra News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं धुळ्यात आगमन

SCROLL FOR NEXT