Court Order esakal
नाशिक

Nashik Crime : रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर कारणीभूत! इगतपुरी न्यायालयाचा निर्णय

Crime News : डॉक्टरला इगतपुरी न्यायालयाने दोषी ठरवीत एक महिन्याचा साधा कारावास रुग्णाच्या वारसास अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : रुग्णावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर चुकीचे वेदनाशामक इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णाचे पोट फुगुन दोन दिवसात मृत्यू झाल्यामुळे रुग्णाच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या डॉक्टरला इगतपुरी न्यायालयाने दोषी ठरवीत एक महिन्याचा साधा कारावास रुग्णाच्या वारसास अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. (Nashik Crime Doctor responsible for patients death Judgment of Igatpuri Court marathi news)

दौंडत (ता. इगतपुरी) येथील विष्णू बोराडे यांना जुलाबाचा त्रास सुरु झाल्याने त्यांच्या पत्नी वंदना बोराडे यांनी त्यांना ११ ऑगस्ट २०१७ रोजी घोटी शहरातील संजीवनी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना १३ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांना अचानक पोटाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना डॉक्टरांनी वेदनाशामक इंजेक्शन दिले.

इंजेक्शनमुळे विष्णू बोराडे यांचा त्रास कमी झाला. मात्र त्यांची लघवी कोंडली जावून पोट फुगले. डॉक्टरांनी पुन्हा एकदा वेदनाशामक इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णाचा त्रास वाढल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना १४ ऑगस्ट २०१७ रोजी विष्णू बोराडे यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी विष्णू बोराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे विष्णू बोराडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कबूल केले. त्यानंतर डॉक्टरांनी मयत विष्णू यांच्या पत्नी वंदना बोराडे यांना ४ लाख रुपये देण्याचे कबुल करून २ लाखांचा धनादेश दिला. श्रीमती. बोराडे यांनी सदरचा धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकला. मात्र बॅंकेने काही कारण पुढे करत चेक पुन्हा वंदना बोराडे यांना परत दिला. याबाबत वंदना बोराडे यांनी डॉ. रमेश सातपुते यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत नंतर पैसे देण्यास नकार दिला.

यामुळे वंदना बोराडे यांनी इगतपुरी न्यायालयात धाव घेऊन डॉ. रमेश सातपुते यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला. त्यानंतर हा खटला इगतपुरी न्यायलयात चालला. ॲड. रोहित उगले यांनी वंदना बोराडे यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत युक्तिवाद करून बाजू मांडली. न्यायालयाने डॉ. रमेश सातपुते यांना दोषी ठरवित एक महिन्याचा साधा कारावास व पिडीतेला अडीच लाखांची नुकसान भरपाई द्यावी. नुकसान भरपाई न दिल्यास दोन महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT