Electricity theft esakal
नाशिक

Nashik Crime News : 5 वर्षांपासून वीज चोरी! 8 लाखांची फसवणूक

Nashik News : वीज मीटरमध्ये छेडछाड करताना गेल्‍या पाच वर्षांपासून वीज चोरी केली जात असल्‍याची घटना उघडकीस आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वीज मीटरमध्ये छेडछाड करताना गेल्‍या पाच वर्षांपासून वीज चोरी केली जात असल्‍याची घटना उघडकीस आली आहे. तब्‍बल ३७ हजार युनिट विजेची चोरी करताना आठ लाखांची फसवणूक केल्‍याप्रकरणी संशयितांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्‍या भरारी पथकाने कारवाई केली आहे. (Crime Electricity theft for 5 years 8 lakh fraud)

अतिरिक्‍त कार्यकारी अधिकारी हरेश भावर यांनी या संशयिताविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार संशयित कमल पवार (५२, रा. पवननगर भाजी मार्केट, सिडको) याने घरातील वीज मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्‍याचे म्‍हटले आहे. (latest marathi news)

थोडे थोडके नव्‍हे तर तब्‍बल गेल्‍या पाच वर्षांपासून वीज चोरी सुरु असल्‍याचे नमूद केले असताना ३७ हजार युनिट अशी आठ लाख रुपयांची वीज चोरी केल्‍याप्रकरणी भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास अंबड पोलिस ठाण्याअंतर्गत केला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

High Court : ... तर तरुणाईचे आयुष्य होणार उद्ध्वस्त, उच्च न्यायालय : तस्करीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT