CBI esakal
नाशिक

Nashik Bribe Case: EPF कार्यालयाचे कर्मचारीही चौकशीच्या फेऱ्यात; लाचप्रकरणात CBI घेणार तक्रारींची दखल

या प्रकरणात इपीएफ कार्यालयाशी संबंधित आलेल्या तक्रारींची गंभीर दखल सीबीआयने घेतली असून, त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही चौकशीची टांगती तलवार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफओ) आयुक्तासह दोघांना दोन लाखांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे.

या प्रकरणात इपीएफ कार्यालयाशी संबंधित आलेल्या तक्रारींची गंभीर दखल सीबीआयने घेतली असून, त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही चौकशीची टांगती तलवार आहे. दरम्यान, लाचप्रकरणात अटक तिघांची सीबीआयच्या मुंबई कार्यालयामध्ये कसून चौकशी सुरू आहे. (Nashik Crime EPF office staff under investigation CBI will take cognizance of complaints in bribery cases)

सीबीआयचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील सीबीआयचे पोलीस निरीक्षण रणजितकुमार पांडे, गजानन देशमुख यांच्या पथकाने गेल्या गुरुवारी (ता.२८) इपीएफचे विभागीय आयुक्त गणेश आरोटे, अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा, ईपीएफओ एजंट बी. एस. मंगलकर या तिघांना २ लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती.

या तिघांना नाशिक विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. १) सीबीआय कोठडी सुनावली आहे. या तिघांच्याही घरझडतीत महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली असून, पथक तिघांनाही मुंबई कार्यालयात चौकशीसाठी घेऊन गेले आहेत.

सीबीआयकडे तक्रारी

ईपीएफओ कार्यालयाशी संबंधित विविध संस्था, कर्मचार्यांच्या तक्रारी नेहमीच असतात. यातील काहींनी तक्रारी सीबीआय नाशिक विभागीय पथकाकडे केलेल्या आहेत.

या तक्रारींची गंभीरपणे दखल घेण्यात येऊन त्यांची पडताळणी केली जात आहे. यामुळे ईपीएफओ कार्यालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्याही मागे सीबीआयच्या चौकशीचा ससेमीरा लागण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT