Burglary Crime esakal
नाशिक

Nashik Burglary Crime: शहरात पाच घरफोड्या; 12 लाखांचा ऐवज चोरीला! आडगावात एकाच इमारतीतील दोन फ्लॅट फोडले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Burglary Crime : आयुक्तालय हद्दीमध्ये घरफोड्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून पाच घरफोड्यामध्ये सुमारे १२ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात एकाच अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना घडलेली असता, त्याची पुनर्रावृत्ती आडगाव शिवारात झाली आहे.

तर, इंदिरानगरमधील कलानगरमध्ये दोन घरफोड्या करीत चोरट्यांनी सुमारे सव्वा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. सततच्या घरफोड्यांनी रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलीसांची गस्ती व शोध पथके कुचकामी ठरल्याचे यामुळे अधोरेखित होते आहे. (Nashik Crime Five burglaries in city 12 lakhs stolen in adgaon)

इंदिरानगर परिसरातील कलानगरमध्ये राजलक्ष्मी सोसायटी आणि गणेश पॅराडाईज अपार्टमेंट येथील दोन फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे. पद्‌माकर गोविंदराव सोनार (५९, रा. श्री राजलक्ष्‌मी सोसायटी, कलानगर, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी ते मंगळवार यादरम्यान त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला.

यात चोरट्यांनी ४८ हजार ४६० रुपयांचा सोन्याचा नेकलेस, १ लाख ५२ हजार १५२ रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या, १ लाख ५२ हजार १८० रुपयांचे सोन्याच्या दोन पाटल्या, ३७ हजार ७९० रुपयांचा सोन्याचा लक्ष्मीहार, ४२ हजारांची सोन्याची चैन, ८ हजार ४२० रुपयांचे सोन्याचे टॉप्स, १९ हजार ५०० रुपयांचा सोन्याचे डोरले असा ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

तर याच परिसरातील नकूल काशिनाथ सिनकर (रा. गणेश पॅराडाईज, कलानगर) यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने २४ हजारांचे सोन्याचे कर्णफुले, ३६ हजारांचे सोन्याचे वेल, ९ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र असा ६९ हजारांचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घरफोडीत ५ लाख २९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक सोनार हे तपास करीत आहेत. (latest marathi news)

एकाच अपार्टमेंटमध्ये दोन घरफोड्या

आडगाव शिवारातील कोणार्कनगर येथील साईव्हिला अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅटचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड असा २ लाख २० हजारांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली आहे. तुषार रघुनाथ शिंदे (रा साईव्हिला अपार्टमेंट, कोनार्कनगर) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १९) पहाटे सहा वाजेपूर्वी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून ५० हजारांच्या रोकडसह दागदागिने व त्याच इमारतीतील सुरेश बाबू राजापन्न आचार्य यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून ४० हजारांची रोकड असा २ लाख २० हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हांडाेरे मळ्यात घरफोडी

हांडोरे मळ्यातील शिव समर्थनगरमध्ये चोरट्यांनी भर दिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून ४ लाख ६१ हजारांचा ऐवज चोरून नेला. राजू हरी हांडोरे (रा. शिव समर्थनगर, हांडोरे मळा, विहितगाव) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. १८) दुपारी साडेचार ते सहा वाजेच्या दरम्यान घरफोडी झाली.

चोरट्यांनी बेडरुममधील कपाटातून ८० हजारांची रोकड, ८१ हजारांचा सोन्याचा राणी हार, १ लाख ५ हजारांची सोन्याची पोत, १ लाख २० हजारांची सोन्याची अंगठी, ४५ हजारांचा सोन्याचा नेकलेस व नथ, ३० हजारांच्या दोन अंगठ्या असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT