Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : चाकूचा धाक दाखवून जबरी लुट! कॉलेजरोडवरील घटना; वृद्धावर चाकूने वार

Crime News : याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी लुटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयिताचा कसून शोध घेत आहेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : कॉलेजरोड परिसरातील बंगल्याची लाईट गेल्याची संधी साधून अज्ञात संशयितांनी बंगल्याबाहेर आलेल्या वृद्‌धाला चाकूचा धाक दाखविला आणि त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल, बँकांची कागदपत्रे, पॅनकार्ड असा सुमारे ४ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेत जबरी लुट केल्याची घटना घडली आहे.

यावेळी एका संशयिताने वृद्‌धाच्या शरीरावर दोन ठिकाणी वार करून जखमी केले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी लुटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयिताचा कसून शोध घेत आहेत. (Nashik Crime Forced robbery with knife news)

७५ वर्षीय शशीकुमार माधवराव तपस्वी (रा. तपस्वी बंगला, कॉलेजरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा तपस्वी नावाचा बंगला आहे. या बंगल्यात ते पत्नीसमवेत राहतात. मंगळवारी (ता. १६) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ते घरामध्ये टीव्ही पहात होते. त्यावेळी अचानक लाईट केली. त्यामुळे ते बंगल्याबाहेर आले.

त्यावेळी बंगल्याच्या गेटजवळ दोघा संशयितांनी त्यांच्या मानेला चाकू लावला आणि आवाज न करण्याचे धमकावले. त्यावेळी आणखी दोघे संशयितांनी बंगल्यात प्रवेश केला. तपस्वी यांना बंगल्यात नेऊन दाम्पत्याला धमकावत घरातील दागदागिने, रोकडसह बँकेची पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड अशी विविध कागदपत्रे ताब्यात घेतले.

तसेच, त्यांच्याकडे शहरात व बाहेर कुठे मालमत्ता आहे, अशीही विचारणा त्यांच्याकडे केली. यावेळी एका संशयिताने वृद्धाच्या हातावर आणि छातीवर चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (latest marathi news)

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह गुन्हेशोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. डॉगस्क्वॉडला पाचारण करण्यात आले. तर, पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील हे करीत आहेत.

वृद्धांची सुरक्षा ऐरणीवर

शहरात बंगले, फ्लॅटमध्ये वृद्ध एकटेच राहतात. संशयितांकडून असे बंगले, फ्लॅटची रेकी करून त्यांना हेरून मारहाण करून चोऱ्या करण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. तशीच घटना शहराच्या मध्यवर्ती असलेल्या कॉलेजरोड परिसरात घडल्याने शहरातील एकट्याने राहणाऱ्या वृध्दांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT