Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : वनतस्कर नवसू लोहारचा कारागृहातील मुक्काम वाढला!

Nashik News : महाराष्ट्र गुजरात सीमेवर कुख्यात वनतस्कर नवसू लोहार ऊर्फ पुष्पा याला खैर तस्कर प्रकरणी न्यायालयाने एक महिन्यानंतर जामीन मंजूर केला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र गुजरात सीमेवर कुख्यात वनतस्कर नवसू लोहार ऊर्फ पुष्पा याला खैर तस्कर प्रकरणी न्यायालयाने एक महिन्यानंतर जामीन मंजूर केला होता. मात्र ५० हजार रुपयांचा जामीन द्यायला कोणी समोर न आल्यामुळे त्याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी जामीन देण्यास कोण येते यावर लक्ष ठेवून आहे कारण याच प्रकरणातील मुख्य सूत्रधार व २५ संशयित अद्यापही फरार आहे. (Forest smuggler Navasu Lohar stay in jail has been extended)

वन विभागाच्या कारवाईमध्ये जवळपास वन तस्कराला एक महिन्यांहून अधिक कालावधी कारागृहाची हवा लागली खावी लागली, असे हे पहिलेच प्रकरण आहे. २१ जूनला महाराष्ट्र व गुजरात सीमेवर मौल्यवान खैर प्रजातींची अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारा कुख्यात खैर तस्कर नवसू लोहार ऊर्फ पुष्पा येथे नाशिक येथे वनविकास पथकाने पकडले. अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसाची वन कोठडी दिली होती.

चौकशी दरम्यान त्यांनी खैर तस्करीत संबंध असलेल्या २५ संशयितांची नावे सांगितली. त्यापैकी १५ संशयित हे गुजरात राज्यातील आहेत. दरम्यानच्या कालावधीत नवसू लोहारची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. (latest marathi news)

या गुन्ह्यांमधील नवसू लोहार ऊर्फ पुष्पाचा तथाकथित मालक शेठ हा अद्यापही फरार आहे. त्यांनी आपल्या राहत्या गावातून गाशा गुंडाळला आहे. अजूनही तो वन विभागाच्या हाती लागलेला नाही. नवसू लोहार हा शेठ चे वन तस्करीचे काम करीत होता. सर्व प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार आहे.

या प्रकरणात आता वन विभाग व वन विकास यांचा संयुक्त तपास सुरू आहे. पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे, सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी, प्रवीण डमाळे, वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT