Suspected thief caught on CCTV camera. In the second photo, Dr. Thieves misplaced belongings in Mamta Patil's flat. esakal
नाशिक

Nashik Crime News : राका कॉलनीत माजी नगरसेविकेचे घर फोडले; कोट्यवधींचे दागिने चोरीला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहराच्या मध्यवस्तीतील राका कॉलनीमध्ये मंगळवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कोट्यवधींचा ऐवज चोरून नेला आहे. हा फ्लॅट माजी नगरसेविकेचा असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून, त्यावरून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. (Former corporator house broken in Raka Colony )

पोलिसांच्या माहितीनुसार, राका कॉलनीतील नवकार रेसीडेन्सी या अपार्टमेंटमध्ये माजी नगरसेविका डॉ. ममता पाटील या राहतात. मंगळवारी (ता.६) पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटबाहेर असलेले ग्रील आणि मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करीत हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड, असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

मंगळवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त मोनिका राऊत, गुन्हेशाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात डॉ. शैलेंद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. ममता पाटील यांच्या फ्लॅटबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. संशयित चोरट्यांनी फ्लॅटबाहेरील संरक्षण ग्रील आणि नंतर मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि ऐवज चोरला. मात्र जाताना त्यांनी सीसीटीव्हीची डिव्हीआरही चोरून नेला. परंतु डॉ. पाटील यांच्या समोरील फ्लॅट बाहेरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डोक्यात टोपी आणि चेहऱ्यावर मास्क, हातात लांब सळई व पाठीवर सॅक असलेला संशयित कैद झाला आहे.

पिढीजात दागिने शाबूत

चोरट्यांनी डॉ. पाटील यांच्या फ्लॅटमधून सोन्याच्या दागिन्यांसह हिरेजडीत मंगळसूत्र, एक ते दीड लाखांची रोकड, विदेशी चलन असा सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर, घरात काही पिढीजात दागिनेही होते. परंतु पॉलिश नसल्याने चोरट्यांनी ते बेनटेक्सचे दागिने समजून नेले नाहीत. त्यामुळे ते दागिने शाबूत राहिले.

डॉ. ममता पाटील या धुळे येथील शासकीय जवाहर वैद्यकीय महाविद्यालयात संचालक असून, सहकुटुंब ते धुळ्यात राहतात. विकेंण्डला ते नाशिकला येतात. डॉ. शैलेंद्र पाटील यांचे कॅनडा कॉर्नर परिसरात हॉस्पिटल आहे. त्यांचा मुलगा वैद्यकीय शिक्षणानिमित्त नाशिकबाहेर आहे. तर पाटील कुटुंबीय हे नाशिकमध्ये कमी आणि धुळ्यात अधिक राहतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfers: निवडणूक आयोगानं झापल्यानंतर आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! लवकरच जाहीर होणार निवडणूक?

विधानसभेसाठी मनसेच्या तयारीपासून ते टीम इंडियातील खेळाडूला शिक्षेपर्यंत, वाचा आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan नोव्हेंबरमध्ये समोरासमोर? जाणून घ्या कोणती स्पर्धा अन् कुठे भिडणार

Nana Patole: हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का? महायुतीवर नाना पटोले संतापले, काय म्हणाले?

Diwali Special Train: दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती

SCROLL FOR NEXT