Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : अबब... तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक! विश्वास संपादन करून घातला गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : आधार इ-सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीचे आमिष दाखविले आणि त्यानंतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेचे करंट अकाऊंट वापरण्यासाठी गळ घालून नाशिकच्या संशयित भामट्याने ठाण्यातील युवकाला तब्बल ३ कोटी ४१ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik crime fraud of three half crore)

अनिल पवार (रा. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. स्वप्निल बनसोडे (रा. बदलापूर, ठाणे) या युवकाच्या फिर्यादीनुसार, त्यांचे बदलापूर येथे आधार इ-सेवा केंद्र आहे. गेल्या २ तारखेला संशयित अनिल पवार याची नांदूर नाका येथील प्रेस्टिज हॉटेल याठिकाणी स्वप्निलची भेट झाली होती. स्वप्निल या इ-सेवा केंद्रासाठी आर्थिक मदतीची गरज होती.

त्यावेळी संशयित पवार याने त्यास ७ लाख रुपये मदत करण्याचे आमिष दाखविले. परंतु त्यासाठी त्याने स्वप्निलच्या बँकेच्या करंट खात्यावरून काही आर्थिक व्यवहार करण्याची अट घातली होती. स्वप्निल याचा संशयितावर विश्वास बसल्याने त्याने संशयिताची अट मान्य केली. (latest marathi news)

त्यानंतर संशयिताने स्वप्निल याचे बदलापूर येथील आयसीआयसीआय बँकेचे खाते, त्या खाते क्रमांकाचे एटीएम कार्ड, त्या कार्डशी लिंक असलेले मोबाईल सीम आणि पीन क्रमांक असे सारी माहिती घेतली. या साऱ्यांचा वापर करीत संशयिताने स्वप्निलच्या बँकेच्या करंट खात्यावरून तब्बल ३ कोटी ४१ लाख २६ हजार ५७६ रुपयांचे गैरव्यवहार केले.

हे करीत असताना त्याने ओव्हर ड्राफ्ट सुविधाचाही वापर केला. त्यामुळे स्वप्निलच्या बँक स्टेटमेंटनुसार ८७ लाख ८९ हजार ४१५ रुपयांची वजा शिल्लक केली आहे. त्यामुळे स्वप्निलचे खाते बँकेने गोठविले आहे. अशाप्रकारे संशयित पवार याने स्वप्निलची साडेतीन कोटींचा गंडा घालून पसार झाला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे हे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT