A video clip of the free-style beating at Pahne went viral on social media. esakal
नाशिक

Nashik Crime News : पहिने परिसरात फ्रि स्टाईल हाणामारी! पोलिसांकडे नोंद नाही; भोंगळ कारभार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : विकेंण्डला पहिने परिसरात मद्यधुंद तरुणाईचा धांगडधिंगा सुरू असतानाच, आता बुधवारी (ता. १७) सुट्टीच्या दिवशी पहिने परिसरात गेलेल्या युवकांमध्ये फ्रि स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर या फ्रि स्टाईलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र तरीही त्र्यंबक पोलिसात याप्रकरणी कोणतीही नोंद नसल्याने ग्रामीण पोलीसांचा भोगंळ कारभार पुन्हा उघडकीस आला आहे. (Nashik Crime Free style fight in pahine area)

गेल्या रविवारी (ता. १४) पहिने येथे पावसात मौजमस्ती करण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली होती. विशेषत: मद्याच्या नशेमध्ये तरुणाई धुंद झाली होती. ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची अधिसूचना जारी केली होती. परंतु पहिने येथे पोलीस हजर असले तरी त्यांनी आडोशाला बसून मद्यधुंद तरुणाईची मस्ती पाहण्यातच धन्यता मानली होती.

बुधवारी (ता. १७) आषाढी एकादशी असल्याने सार्वजनिक सुट्टी होती. परिणामी, तरुणाईने पहिने परिसरातील धबधबे, ओढे-नाल्यांकडे आपला मोर्चा वळविला होता. त्यातच, पहिनेच्या अलिकडे डोंगरदर्यातून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यांमध्ये भिजण्याचा आनंद घेत असताना तरुणांच्या दोन गटामध्ये तुफान राडा झाला.

यावेळी एका तरुणाने दुसऱ्याला ओढ्याच्या पाण्यात बेदम मारहाण केली तर दुसऱ्याने थेट दगड उचलून त्याच्या डोक्यात टाकण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने दगड हुकला. अन्यथा त्या तरुणाच्या जीवावरच बेतले असते. हुल्लडबाजी करणाऱ्या या तरुणांवर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी पोलीसही नव्हते. (latest marathi news)

या घटनेचा मोबाईलमध्ये काढण्यात आलेला व्हिडिओ गुरुवारी (ता. १८) सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या घटनेची वाच्यता झाली. परंतु त्र्यंबकेश्वर पोलिसांना या घटनेची कानोकान खबर नव्हती. त्यामुळे पोलिसात कोणतीही नोंद नसल्याचे समजते.

अधीक्षकांची अधिसूचना नावालाच

पहिने परिसरात अवैध धंदे वाढले आहेत. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्यासाठी याठिकाणी विनापरवानगी सुरू असलेल्या हॉटेल्समधून मद्याचा राजरोसपणे पुरवठा होतो. मांसाहारी पदार्थ बनवून दिले जातात. त्यामुळे याठिकाणी विकेंण्डला तरुणाईची तोबा गर्दी असते. ठिकठिकाणी थाटलेल्या अनधिकृत हॉटेल्समध्ये पार्ट्या चालतात.

त्यातून हुल्लडबाजी होऊन मारहाणीचा घटना सातत्याने घडतात. मद्यपींविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. आरटीओने कारवाईचा प्रयत्न केला परंतु गेल्या रविवारी (ता १४) त्यांनाही मद्यपींच्या हुल्लडबाजीमुळे काढता पाय घ्यावा लागला होता. ग्रामीण पोलीस अधीक्षकांची कारवाईची अधिसूचना अखेर नावालाच राहिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT