नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी असतानाही गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. त्यानुसार, उपनगर, नाशिकरोड आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तीन मंडळांचे पदाधिकारी व डीजे सिस्टिम मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्य मिरवणुकीत आणखीही काही मंडळांनी डिजेचा दणदणाट केला असून त्यांनाही दणदणाट भोवण्याची शक्यता आहे. (ganesh visarjan procession DJ make noise Three case filed)
उपनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार नवनाथ पोरजे यांच्या फिर्यादीनुसार, विनापरवानगी डीजे वाजविणाऱ्या जेलरोडचा राजा मित्र मंडळ, सावरकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत अनिल गामने (रा. सावरकरनगर, जेलरोड), सुमित साठे, डॉल्बी साऊंड सिस्टिमचे मालक उमेश सुरेश कुमावत या तिघांविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याचप्रमाणे, नाशिकरोडचे अंमलदार विशाल साळुंके यांच्या फिर्यादीनुसार, हिंदशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश वसंत गवारे, विवेक लालबेग (दोघे रा. पवारवाडी, जेलरोड), डीजेचा मालक शुभम पोपट बर्डे (रा. ओझरमिग) या तिघांविरोधात नाशिकरोड पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
तर, सरकारवाडाचे अंमलदार सुधीर पाटील यांच्या फिर्यादीनुसार, युनायटेड महिला सोशल फाऊंडेशनने विसर्जन मिरवणुकीत विनापरवानगी डीजे वाजवून ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात मंडळाच्या अध्यक्षा दीपा अमोल कमोद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)
आणखी कारवाईची शक्यता
आयुक्तालयातर्फे गणेशोत्सवापूर्वी घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकींमध्ये नियमांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी करतानाच, उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. परंतु तरीही गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी डीजेचा दणदणाट केलाच.
विशेषत: यात शांतता समितीचे सदस्यांच्या मंडळांकडून डीजेचा दणदणाट केला. पोलीस ठाण्यांकडून डीजेच्या ध्वनीमर्यादेच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यानुसार सविस्तर अहवालानंतर आणखी काही मंडळांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.