Suspect arrested with four sharp knives from College Road area. including a team of the City Crime Branch Unit One. esakal
नाशिक

Nashik Crime : कोयता बाळगणारी अल्पवयीन संशयितांची टोळी गजाआड; खुनाचा सूड घेण्यासाठी आखत होते कटकारस्थान

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : धारदार कोयते बाळगून टवाळखोरी करणाऱ्या चौघांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. या चौघातील तिघे हे अल्पवयीन असून, त्यांच्याकडील बॅगेतून चार धारदार कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, २०१८ मध्ये संत कबीरनगरमध्ये झालेल्या वाघमारे खुनाचा सुट घेण्यासाठी ही टोळी कटकारस्थान रचत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. (Nashik Crime gang of juvenile suspects jailed)

राहुल गौतम वाघमारे (१८, रा. बुद्धविहार, संत कबीरनगर) असे संशयिताचे नाव असून त्याच्या समवेत १७ वर्षाचे दोघे व एक १६ वर्षांचे असे तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरगुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार मिलिंदसिंग परदेशी यांना काही संशयित युवक हे कॉलेजरोडच्या मॉडेल कॉलनी परिसरामध्ये संशयितरित्या फिरत असल्याची खबर मिळाली होती.

यासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर, युनिट एकच्या पथकाने मॉडेल कॉलनी परिसरातील रेणुका गॅरेजसमोरील यशवंत कॉलनीत सापळा रचून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांच्या संशयितांकडे असलेल्या काळ्या बॅगेची झडती घेतली असता, त्यामध्ये धारदार चार कोयते आढळून आले आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. तपास हवालदार मोरे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, अप्पा पानवळ, मुक्तार शेख, राजेश राठोड, अमोल कोष्टी, किरण शिरसाठा यांच्या पथकाने बजावली आहे. (latest Marathi News)

सुडाचे कारस्थान

संत कबीरनगरमध्ये १५ जून २०१८ रोजी रात्री राजू शेषराव वाघमारे (४५) यांचा संशयित संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात (दोघे रा. संत कबीरनगर झोपडपट्टी), सुंदर लक्ष्मण खरात, प्रशांत सुंदर खरात (रा. गौतमनगर झोपडपट्टी, अंबड, नाशिक) यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात खून झाला होता.

कोयत्यासह अटक केलेला राहुल वाघमारे हा मयत राजू वाघमारे याचा नातलग असून, त्याच्या मनात खुनातील संशयित करात टोळीविषयी सुडाची भावना आहे. त्यासाठी तो टोळी तयार करीत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. संशयित खरात टोळीतील सदस्यांचा ‘गेम’ करण्याचा कारस्थान रचण्यासाठीच तो टवाळखोरांची टोळी व कोयत्यासारखे धारदार हत्यारे बाळगत असल्याचेही तपासातून समोर आले आहे.

अल्पवयीन टवाळखोर

राहुल वाघमारे याच्यासोबत ताब्यात घेण्यात आलेले तिघे अल्पवयीन आहेत. त्यांनी शालेय शिक्षण घेतले असून, सध्या ते शिक्षण न घेता टवाळक्या करतात. संशयित वाघमारे हा त्यांच्या म्होरक्या असून, दमदाटी करणे, हत्यार दाखवून भिती घालणे असे उद्योग ही टोळी संत कबीरनगर व परिसरात करीत असते.

"संशयित वाघमारे याने अल्पवयीन टवाळख्यांना सोबत घेत टोळी बनविण्याचा, भाईगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या खुनप्रकरणातील सुडाची भावना त्याच्या मनात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येते आहे. अजून तपास सुरू आहे."

- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर गुन्हेशाखा युनिट एक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT