Nashik Crime News : रविशंकर मार्गावरील इमारतीत असलेल्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून तब्बल दोन लाखांचे शर्ट, पॅन्ट, अंडरवियर असे कपडे चोरून त्यांची गंजमाळ झोपडपट्टीमध्ये विक्री करणाऱ्या महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने या टोळीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. (Nashik Crime Gang of women stealing clothes jailed)
मंगल मुकेश सुरंजे (२८, रा. घर नं ५२, भिमवाडी, गंजमाळ भद्रकाली), शारदा ईश्वर घोडे (३०, रा. दिंडेवाडा, म्हसरूळ टेक, भद्रकाली), सुनिता दामोदर चव्हाण (२५, रा. घर नं ४९, भिमवाडी, गंजमाळ, भद्रकाली), दीपाली संतोष गुडेकर (२२, रा. घर नं १०५, भिमवाडी, गंजमाळ, भद्रकाली), शिला बाबासाहेब पाईकराव (२७, रा. घर नं सी ५०, भिमवाडी, गंजमाळ, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत.
विजय-ममता थिएटरच्या पाठीमागे असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटचा संशयित महिलांनी कडीकोयंडा तोडून तब्बल २ लाख रुपयांचे विविध कंपन्यांचे शर्ट, पॅन्ट, बनियन, अंडरवियर असे कपडे चोरून नेले. हे चोरीचे कपडे गंजमाळ झोपडपट्टीमध्ये विक्री होत असल्याची खबर शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाचे अंमलदार विशाल काठे यांना मिळाली होती.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या सुचनेनुसार पथकाने सापळा रचून चोरीचे कपडे विक्री सुरू असताना संशयित पाचही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील कपड्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली असून, १लाख २० हजार ५८० रुपयांचा कपडे जप्त करण्यात आला आहे. तपासाकामी संशयित महिलांना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखीही चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. (latest marathi news)
सदरची कामगिरी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुगन साबरे, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, महेश साळुंके, विशाल काठे, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, राजेश राठोड, राम बर्डे, अनुजा येवले यांच्य पथकाने बजावली.
दोन लाखांचे कपडेच चोरले
शंतनू कुर्डुकर (रा अत्रेय बंगला, विजय-ममता .िथएटरमागे) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे गोविंद कमल अपार्टमेंटमध्ये कपड्याचे गोदाम असून, सोमवारी (ता. १५) रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कपडे ठेवलेल्या फ्लॅट क्रमांक एकचा कडीकोयंडा तोडून शर्ट, पॅन्ट, बनियन, अंडरविअर असा २ लाखांचा माल चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.