CCTV footage of Koita in the hands of goons. esakal
नाशिक

Nashik Crime News : गौळाणेचे सरपंच अजिंक्य चुंभळेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लेखानगर येथे बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे, माजी नगरसेविका कल्पना चुंबळे व गौळणे गावाचे सरपंच अजिंक्य चुंभळे यांच्यावर काही गावागुंडांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र चुंभळे हे त्यांच्या संपर्क कार्यालयात गेल्याने हा अनर्थ टळला. घटना घडल्यानंतर चुंभळे समर्थकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. (Gaulane Sarpanch Ajinkya Chumble attacked with Koita)

गुरुवारी (ता. ११) पाचच्या सुमारास अजिंक्य चुंभळे त्यांच्या कार्यालयात असताना अज्ञात पाच- सहा गावागुंडांनी अंडाभुर्जी विक्रेत्यास दमबाजी केली. या वेळी चुंभळे यांनी भुर्जी विक्रेते व गावागुंडांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटत नसल्याने पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचा राग आल्याने काही वेळाने गावगुंड हातात हत्यार घेऊन आले.

बेसावध असलेल्या चुंभळे यांच्यावर प्राणघातक हत्यारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र चुंभळे हे त्यांच्या संपर्क कार्यालयात गेल्याचे पाहून त्यांनी पळ काढला. अंबड पोलिसांना ही बाब समजल्यानंतर त्यांनीही घटनास्थळ गाठले. (latest marathi news)

तर अजिंक्य चुंभळे यांना समजावून सांगत संशयित आणि विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत याबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हल्ला करण्यासाठी आलेल्या गावागुंडांपैकी एकाने मी अल्पवयीन आहे. हत्यार माझ्याकडे द्या मी हल्ला करतो. माझ्यावर काहीही कार्यवाही होणार नाही असे व्यक्तव्य केल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT