Nashik News : परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बकऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस बकऱ्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहे. रविवारी (ता. २८) दुपारी दोनच्या दरम्यान चारचाकी गाडीतून आलेल्या चोरट्यांनी राम मंदिर परिसरात कुणीही नसल्याचा फायदा घेत दोन बकऱ्या चोरून पलायन केल्याचे दृश्य ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. (Goat thieves caught on CCTV camera)
पोलिसांनी या चोरांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खामखेडा येथील निवृत्ती बिरारी यांच्या बकऱ्या दुपारच्या वेळेस मोकळ्या असल्याने घराजवळील राम मंदिर परिसरात फिरत होत्या. त्यावेळी सँट्रोकार मंदिराजवळ आली. या चालकाने कारजवळ बकऱ्या आल्यावर दोन्ही बकऱ्या कारमध्ये कोंबून पलायन केले.
बकऱ्या चोरीची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरगाव येथील ग्रामस्थांनी सरपंच वैभव पवार यांना संपर्क साधत आमच्या गावातील तीन बकऱ्या चोरीला नेल्याचे सांगितले. त्यांच्याकडील सीसीटीव्हीतील कार व खामखेडा येथील कार एकच असून, गाडीचा नंबर कैद झाला.
मात्र, त्या नंबरची चौकशी केली असता तो बनावट नंबर असून, दुचाकीचा असल्याचे निष्पन्न झाले. चोरटे कुठल्याही वाहनाचा नंबर टाकून ती नंबर प्लेट कारला लावून अशा पद्धतीने शेळ्या, जनावरे चोरी करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (latest marathi news)
निवृत्ती बिरारी यांचे साधारणत: १८ ते २० हजाराचे नुकसान झाले असून, मागील तीन-चार महिन्यांपूर्वी देखील गावातील आदिवासी बांधवांच्या अशाच मोकाट बकऱ्या चोरुन नेल्या होत्या. पोलिसांनी या बकऱ्या चोरांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
"मागील चार-पाच महिन्यांपासून खामखेडा, सावकी, लोहणेर परिसरातील अनेक गावांमधून बकऱ्या चोरीला जाण्याचे सत्र सुरूच आहे. पोलिसांनी या चोरांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा."- वैभव पवार, सरपंच, खामखेडा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.