Gold chain thieves caught red-handed in Indiranagar area esakal
नाशिक

Nashik Crime News : स्थानिक युवकाच्या मदतीने सोनसाखळी चोरट्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून नेणाऱ्या दोघा संशयित सोनसाखळी चोरांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. बुधवारी (ता.३१) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील रथचक्र चौकात हा सर्व प्रकार घडला. परवेझ मणियार, निशांत हांडोरे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास रथचक्र चौकात इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या एका पथकाकडून स्टॉप ॲण्ड सर्च ऑपरेशन राबविले जात होते. (Gold chain thieves arrested with help of local youth)

याच दरम्यान येथील स्थानिक युवकांना परिसरात दुचाकीवर दोन युवक हे संशयास्पद फिरत असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलिस ठाण्यात माहिती दिली. ठाण्यातील अधिकारी परिसरात असलेल्या पथकाला याबाबत सांगितले. पथकातील अधिकारी यांना देखील परिसरातील फिरत असलेल्या या दोघांवर संशय होताच. याच दरम्यान दोघे संशयित हे रथचक्र चौक येथील मागच्या बाजूस असलेल्या बाप्पा चौकात येताच त्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पलायन करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी स्थानिक तरुणांनी दुचाकीवरुन या संशयित सोनसाखळी चोरट्यांच्या दुचाकीला धक्का देत पाडले. यावेळी पाठीमागून आलेल्या पोलिस पथकाने तत्काळ या दोघा संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन इंदिरानगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा उशिरापर्यंत सदर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दोघा संशयित यांना अटक केल्याने शहरातील सोनसाखळी चोरीचे आणखी गुन्ह्यांची उकल होणार असल्याची असल्याची माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत अजितदादा 'एम' कार्ड खेळणार; चार उमेदवारांची नावेही समोर

Seema Deo: सुनेसोबत अशा वागायच्या सीमा देव; सासूबाईंबद्दल बोलताना स्मिता देव म्हणाल्या- त्या घरी असल्या की..

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिल्याने जेष्ठ नागरिकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT