सिन्नर : दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा चोरट्यांनी साठ वर्षीय वृद्ध महिलेला हेरत तिला रस्ता विचारण्याचा बहाना करत बोलण्यात गुंतवून ठेवले व तिच्या गळ्यातील सुमारे ४७ हजार रुपयांची सोन्याचे मनी असलेली माळ आणि गंठण लांबवल्याची घटना सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. (Nashik Crime Gold worth 47 thousand taken from old womans neck Chapdgaon incident in Sinnar taluka)
यशोदाबाई रघुनाथ बोडके यांची दापूर-अकोले रस्त्यावर वस्ती असून बाजूलाच शेती आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी द्या शेताकडे जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले. आम्हाला देवठाणला जायचे आहे.
देवठाण कडे जाणारा रस्ता हाच आहे का असे त्यांनी विचारात यशोदाबाई यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. या दोघांचे वय 30 ते 35 दरम्यान असावे. दोघांनीही तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला होता.
बोलण्यात गुंतवत ठेवत असतानाच पाठीमागे बसलेल्या तरुणाने यशोदाबाई यांच्या गळ्यातील 5 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण व साडेसात ग्रॅम वजनाची सोन्याच्या 80 मण्यांची माळ ओरबाडली. काही क्षणात ते दोघे देवठाणच्या दिशेने पसार झाले.
त्यानंतर यशोदाबाई यांनी आरडाओरडा केला. आजूबाजूचे शेतकरी व त्यांच्या घरची मंडळी तात्काळ धावून आली. तोपर्यंत दुचाकी स्वार गायब झाले होते.
स्थानिक तरुणांनी मोबाईल फोनवरून या घटनेची माहिती देत देवठाण सह चास, भोजापुर परिसरात अज्ञात दुचाकीस्वारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.