Jewel thief jailed esakal
नाशिक

Nashik Crime : हाऊसकिपरची ‘टीप’ अन्‌ चोरट्यांनी साधला डाव! ICICI बँकेतील सोनेचोरी; एकाला अटक, 39 लाखांचे सोनेही जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : आठवडाभरापूर्वी जुना गंगापूर नाक्यावरील आयसीआयसीआय बँकेच्या लॉकरमधील तब्बल पाच कोटींचे सोन्याचे दागिने चोरून घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात शहर गुन्हेशाखेला यश आले आहे. बँकेच्या हाऊसकीपिंगचे काम करणाऱ्याने बँकेतील ऐवजाची टीप दिली आणि त्यानुसार एकाने दोघांच्या माध्यमातून ही घरफोडी घडवून आली. याप्रकरणी पोलिसांनी हाऊसकीपींगचे काम करणाऱ्यासह ३९ लाखांचे सोने जप्त केले आहे. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. (Nashik Crime Gold heist at ICICI Bank news)

तुकाराम देवराम गोवर्धने (रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यास अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ४ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोघा चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील एसी काढून तेथून आत प्रवेश केला. चाव्या घेऊन लॉकर उघडले आणि ४ कोटी ९२ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे.

शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करताना बँकेतील कर्मचार्यांची चौकशी सुरू केली असता, त्यावेळी बँकेत स्वच्छतेचे काम करणार्या संशयित गोवर्धने याचा जबाबात विसंगती निदर्शनास आली. त्यानुसार त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानेच गावातील मित्र वैभव लहामगे (रा. सांजेगाव) यास बँकेतील तिजोरी, चाव्या आणि सोन्याची माहिती दिली होती. संशयित वैभव याने सतिश चौधरी, रतन जाधव (दोघे रा. सिडको) यांना दिल्यानंतर या दोघांनी घरफोडीचा कट रचून तो अंमलात आणला. आठवडाभराने पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली असून, तिघा संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक गजानन इंगळे, रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, प्रविण वाघमारे, नाझीम पठाण, संदीप भांड, शरद सोनवणे, विशाल देवरे, मक्तार शेख, प्रशांत मरकड, सुगन साबरे यांच्या पथकाने बजावली. (latest marathi news)

सीसीटीव्हीमुळे सापडला माग

गुन्ह्यात कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांनी बँकेतून बाहेर पडणार्या मार्गांवरील सीसीटीव्ही तपासले असता, दोघे संशयित दुचाकीवरून जाताना दिसले. त्याच दिशेने उलट प्रवास करीत पोलिसांनी सुमारे ११ कि.मी. अंतरापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोघे संशयित सिडकोतील महाराणा प्रताप चौकातील असल्याचे निष्पन्न झाले.

३९ लाखांचे सोने जप्त

सिडकोत राहणारा संशयित सतिष चौधरी याने चोरी केलेल्या सोन्यापैकी काही सोने त्याच्या आईकडे दिल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी चौकशीसाठी त्याची आई रेखा चौधरी हिच्याकडे चौकशी केली. चोरीचे सोने वितळवून २ लगड केलेल्या ३९ लाख ५२ हजार ३५० रुपयांचे सोने तिच्याकडून जप्त केले आहे. संशयित वैभव लहामगे, सतिश चौधरी, रतन जाधव यांचा पोलीस शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT