Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांनी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पाचही जिल्ह्यातून २२० सराईत गुंडांची हद्दपारी करण्यात आली असून, सुमारे २१ हजार गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. (Nashik Crime Ig statement of Deportation of 220 gangsters from area marathi News)
लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया नाशिक परिक्षेत्रामध्ये सुरू आहे. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी, नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीणसह अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांना भेट देत त्या-त्या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध, निवडणुकीत उपद्रवी ठरणारे संशयित, सोशल मीडियावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे संशयित गुन्हेगारांचे वर्गीकरण करून त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई पाचही जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे.
त्यानुसार, परिक्षेत्रातून २२० सराईत गुंडांची हद्दपारी, ४३ गुंडांना स्थानबद्ध, २१ हजार ८६१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच, अहमदनगर जिल्ह्यातील लोणी, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील तीन टोळ्यांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यास विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसात प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.
अहमदनगर आघाडीवर
विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार, परिक्षेत्रात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे. पाचही जिल्ह्यातून सर्वाधिक हद्दपारी (६९) व प्रतिबंधात्मक कारवाई (१०,९९१) अहमदनगर जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत.
परिक्षेत्रातील प्रतिबंधात्मक कारवाई
जिल्हा ......... हद्दपार....... स्थानबद्ध......प्रतिबंधात्मक
अहमदनगर.... ६९.....०८......१०९९१
जळगाव.... ५०.....२६.....४०५३
नाशिक (ग्रामीण)....२६....०९.....१६२१
धुळे.... ५४....००.....१८४६
नंदूरबार..... २१.....००.....३३५०
एकूण .....२२०.....४३.....२१८६१
''नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्हा अधीक्षकांना आपापल्या कार्यक्षेत्रात सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. येत्या काही दिवसात प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली जाईल.''- डॉ. बी.जी. शेखर-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.