Liquor stocks and officers and employees seized in the State Excise Office esakal
नाशिक

Nashik Crime News : कुकूडाणे येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून 10 लाख रूपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

Crime News : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाकडून संयुक्तीकरीत्या कारवाई करण्यात येऊन साधारण 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करून संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कळवण : गुजरात राज्यातून महाराष्ट्र येत असलेल्या बेकायदेशीररीत्या मद्यसाठा आणत असलेल्या संशयित व्यक्तीच्या कळवण राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी व दिंडोरी भरारी पथकांने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत कुकूडाणे ता. सुरगाणा येथे तब्बल १० लाख रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. (Nashik Crime Illegal liquor stock seized at Kukudane)

लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात सुरु असलेल्या रात्रीच्या गस्ती दरम्यान कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार मद्यसाठा वाहतुकीवर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाकडून संयुक्तीकरीत्या कारवाई करण्यात येऊन साधारण 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करून संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‌निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभागाचे पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, डॉ. विजय सुर्यवंशी (भा.प्र.से.), प्रसाद सुर्वे संचालक (अं, ब, व दक्षता) , उषा वर्मा विभागीय उप-आयुक्त नाशिक विभाग, नाशिक, अधीक्षक नाशिक शशिकांत गर्जे, .उप अधीक्षक अ.सु. तांबारे यांचे मार्गदर्शनाखाली कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने दि.18 रोजी कुकूडणे. ता सुरगाणा. जि. नाशिक येथे दारुबंदी गुन्ह्याकामी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना कुकूडणे येथे अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम संशयास्पद हालचाल करतांना दिसून आले.

रेडींग पार्टी मधील अधिकारी व कर्मचारी विजेच्या प्रकाशात संशयिताच्या दिशेने जात असताना सदरील ठिकाणी उपस्थित सर्व संशयित काळोखाचा फायदा घेऊन पळून गेले. रेडींग पार्टी मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पळत असलेल्या संशयिताचा झाडा झुडपातून व दगड धोंड्यामधून पाठलाग केला. (latest marathi news)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल असा

परंतु संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यास यशस्वी ठरले. याठिकाणी दादर नगर हवेली व दमण दिवा या ठिकाणाहुन विक्रीसाठी असलेला तसेंच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 36 सिलबंद बाटल्या 3 बॉक्स, इम्पॉरियल ब्लु व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या 24 सिलबंद बाटल्या 2बॉक्स, इम्पॉरियल ब्लु व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 1392 सिलबंद बाटल्या 29 बॉक्स, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 1488 सिलबंद बाटल्या 31 बॉक्स, रॉयल स्पेशल प्रीमियम व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 432 बाटल्या 9 बॉक्स, किंग फिशर तीव्र बियर 500 मिली क्षमतेच्या 96 बाटल्या 4 बॉक्स, असा परराज्यातील अवेधरित्या बाळगलेल्या विदेशी मद्यसाठ्ठयाचे एकूण 88 बॉक्स जप्त करण्यात आले.

तसेंच सदर मद्यसाठा वाहतुकीकरता ठेवलेल्या दुचाकी वाहन क्र.GJ -26-ap 6419, दुचाकी वाहन क्र. G.j -21-d c -6990, दुचाकी वाहन क्र. G j-21 d c 1902 असे तीन दुचाकी सह कारवाई मध्ये वाहनासह एकूण 10,04,000/ किंमतीचा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई वेळी मुख्य आरोपी त्रिकमराम मेजलानी रेबारी उर्फ शिवा मारवाडी हा संशियित फरार असून त्याचे विरोधात व जप्त दुचाकी वाहनाच्या चालक मालक यांचे विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ( अ ), (ई ) 80,83, व 90 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील , ए. बि. बनकर, रा. म. डमरे, एम. डी. कोंडे, ए. बि. पवार, आर. बि. जगताप, एस. के. शिंदे, जवान सर्वश्री. दिपक आव्हाड, गोकुळ शिंदे, विलास कुवर, गोरख गरुड, गणेश शेवगे, पोपट बहीरम, योगेश साळवे, दीपक नेमणार केशव चौधरी, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT