Nashik News : जयपूर (ता. बागलाण) येथील ग्रामस्थांनी मोसम नदीपात्रातून अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई करीत ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात दिला. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असल्याने आठ दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी वाळू तस्करांना इशारा दिला होता. जायखेडा पोलिसांना निवेदन देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. (Nashik Crime Illegal sand smuggling exposed)
अपेक्षित पाऊस होत नसल्याने पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. जायखेडा जयपूर वाडीपिसोळ आदी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरी नदीकाठावरच आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम या विहिरींच्या पाणी पातळीवर झाला आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
अशाच प्रकारे वाळू उपसा होत राहिल्यास पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार असल्याने जयपुरचे नागरिक खडबडून जागे झाले आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन नागरिकांनी एकत्र येत तस्कराविरोधात रणशिंग फुंकले आहे. मोसम नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार नागरिकांनी केला असून.
यासंदर्भात गेल्या आठ दिवसापूर्वी पोलिसांना योग्य ती कारवाई व सहकार्य करण्यासंदर्भात निवेदन ही देण्यात आले आहे. या सर्व घडामोडी नंतर गेली दोन-तीन दिवस वाळू उपसा बंद राहिला. मात्र, वाळू तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. ट्रॅक्टर व अन्य वाहनांच्या साह्याने पुन्हा वाळू उपसा सुरू झाला आहे. (latest marathi news)
अशाच प्रकारे वाळू उपसा करीत असलेले एक ट्रॅक्टर जयपूर नागरिकांनी मध्यरात्रीच्या सुमारास पकडले. याबाबत निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना मस्तानी भ्रमणध्वनीद्वारे खबर दिली. त्यांनी तत्काळ पोलिस कर्मचारी भूषण मोरे, सागर शेवाळे, भूषण पगार आदीना घटनास्थळी पाठवून ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
यापूर्वीही गुन्हे दाखल
जायखेडा पोलिसांनी क्रमांक नसलेले ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ट्रॅक्टरचालक बबन पवार व ट्रॅक्टर मालक सागर सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. या आधीही सागर सोनवणे याने वाळू वाहतुकीला मज्जाव करणाऱ्या तहसिलदारांच्या पथकावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.