Nashik Crime News : द्राक्षाला समाधानकारक बाजारभाव मिळत आहे, ही बाब काही समाजकंटकांना खुपत असल्याने सोशल मीडियावर त्यांनी द्राक्ष या फळपिकाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे ग्राहकांत गैरसमज पसरविणाऱ्या प्रवृत्तींना लगाम घालावा, यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. (Nashik Crime in case of defamatory grape video )
त्यांनी याची तत्काळ दखल घेत पुढील तपासाचे आदेश दिले. सध्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली जाणारी द्राक्षे अनेक संकटांतून सावरत, शेडनेट क्राँपकव्हर देत वाचविली आहेत. या द्राक्षांना सध्या विदेशाबरोबरच गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली या प्रमुख राज्यांत मोठी मागणी आहे. बाजारपेठेत द्राक्षमालाचा खप वाढला.
द्राक्षमालाची वाढती मागणी व बाजारभावातील तेजीमुळे द्राक्षाला बदनाम करण्यासाठी व द्राक्ष पिकांचे पर्यायाने शेतकरी व व्यापारी यांचे नुकसान व्हावे, या कृतघ्न वृत्तीतून द्राक्षाबद्दल फेसबुक, इन्स्टाग्राम अकौंटवरून द्राक्षे आरोग्यास अपायकरक आहेत, असा मेसेज व्हायरल करण्यात आला. द्राक्षमालाचे उत्पादन हे अॅपेडाने ठरवून दिलेल्या रेसिड्यूविरहित नियमावलीनुसार घेतले जाते.(latest marathi news)
मानवी शरीरास अपायकारक असा कोणताही घटक नसल्याचे ‘एनआरसी’मार्फत कळविले जाते. तरीही जाणीपूर्वक दिशाभूल करणारे संदेश पसरविले जात आहेत. या समाजमाध्यमातील अकौंटची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, नाशिक विभागीय मानद सचिव बाळासाहेब गडाख, संचालक रावसाहेब रायते, सुरेश कळमकर, नाशिक विभागीय संचालक अॅड. रामनाथ शिंदे, बाळासाहेब वाघ, शिवलाल ढोमसे यांनी दिले.
डॉ. शेखर यांनी त्वरित नाशिक पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांना निर्देश देऊन कारवाईच्या सूचना दिल्या. श्री. देशमाने यांनी सायबर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यामार्फत पुढील कारवाई करीत सायबर पोलिस शाखेत तक्रार नोंदवून घेतली आहे. संबंधित अकौंटवरील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी कारवाई करण्यात करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.