Nandesh Vijay Salve  esakal
नाशिक

Nashik Crime : सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून; पाथर्डी गावातील घटना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी गावातील काजी मंजिल इमारतीसमोर जुन्या वादाची कुरापत काढून सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करीत सराईत गुन्हेगारांचा खून केला. नंदेश विजय साळवे (२०, रा. विल्होळी, ता. नाशिक) असे मयत युवकाचे नाव असून, इंदिरानगर पोलिसांनी याप्रकरणी सहा संशयितांना अटक केली आहे. यश उर्फ आयुष दोंदे, प्रफुल्ल दोंदे, दुर्गेश शार्दुल, रोहीत वाघ, गौरव दोंदे, करण बावळ अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अहेत. (incident in Pathardi village criminal was stabbed to death with sharp weapon )

शशिकांत गांगुर्डे (रा. विल्होळी, ता नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, नंदेश रविवारी (ता.२२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास विल्होळी येथून पाथर्डी फाटा परिसरात आला होता. पाथर्डी गावातील काजी मंजिल इमारतीसमोरून तो पायी जात होता. त्यावेळी संशयितांची त्याची भेट झाली. त्यांच्यात यापूर्वीही वाद झालेला होता. मद्याच्या नशेतील नंदेश व संशयितांमध्ये पुन्हा वाद झाला असता, त्यावेळी संशयितांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांसह लाकडी दांडक्याने त्याच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात नंदेश गंभीररित्या जखमी झाला असता, त्याच उपचारासाठी सुरुवातीला खासगी व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैदयकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळता पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांची ओळख पटताच पथकांनी त्यांचा माग काढत सोमवारी (ता. २३) पहाटेपर्यंत सर्व सहाही संशयितांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, मयत नंदेश याच्यावर यापूर्वीही इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल असून भाईगिरी करायचा. गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक सोनार हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Editorial Article : अग्रलेख - विकृतीला पायबंद

Sakal Editorial Article : भाष्य - अमेरिकी निर्बंधांचे 'औषध'

Sakal Editorial Article : हौस ऑफ बांबू - 'पुरुषोत्तम' साठीचा झाला नव्हं..!

सकारात्मक विचारसरणीचे फायदे

‘आहारही काटेकोर हवा’

SCROLL FOR NEXT