police arrested  esakal
नाशिक

Nashik Crime News : प्राणघातक हल्ल्यातील सराईंतांच्या मुसक्या आवळल्या; कॅफेचालकावर केला होता हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गंगापूर रोडवरील कॅफेचालकावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पसार असलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांना वडाळागाव परिसरातून जेरबंद करण्यात आले आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मनिष उर्फ ओम शिवाजी काजळे (२२, रा. माळी गल्ली, वडाळागाव), यश हर्षद खोडे (२३, रा. अल्ला निवास, विधातेनगर), दीपक शंकर शेट्टी (२४, रा. राजवाडा, वडाळागाव) अशी जेरबंद करण्यात आलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. (innkeepers of deadly attack attacked cafe operator )

अक्षय विकास बढे (रा. कर्मयोगी नगर, सिडको) यांचे जुना गंगापूर नाक्याजवळील खतीब डेअरीजवळ ड्यूड्स कॅके आहे. त्याच्यावर संशयितांनी कुरापत काढून बुधवारी (ता. ३) रात्री धारदार हत्याराने मानेवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मित्र अक्षय निकम मदतीला धावून आला असता, त्यासही संशयितांनी मारहाण केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे.

मात्र संशयित गुन्हा घडल्यापासून पसार होते. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक संशयितांचा शोध घेत असताना, अंमलदार विशाल काठे, राम बर्डे यांना संशयित ओमची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने मुंबई-आग्रा उड्डाणपुलाखाली वडाळानाका येथे संशयित ओम काजळे यास सापळा रचून अटक केली. गुन्ह्यासंदर्भात चौकशी केल्यानंतर पोलिसांनी वडाळागाव परिसरातून संशयित यश आणि दीपक या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, तपासाकामी तिघांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, राम बर्डे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, अनुजा येवले, किरण शिरसाठ यांनी बजावली.

असा होता प्रकार

फिर्यादी अक्षय बडे व मित्र अक्षय निकम यांचा भागीदारीत जुना गंगापूर नाका येथे कॅफे आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची ओळख ऐश्वर्या आडगावकर, संशयित ओम् काजळे व साथीदारांशी झाली. याच ओळखीनंतर संशयित कॅफेत येऊ-जाऊ लागले. त्यातच बुधवारी (ता.३) रात्री साडेनऊ वाजता ओम् हा साथीदारांसह कॅफेत आला. त्याने चर्चा करत कॅफेचालक बढे याच्याशी एैश्वर्या हिच्याशी मैत्रीचे संबंध ठेवण्यावरून वाद घातला. यावेळी संशयितांनी धारदार शस्त्राने बढे याच्या मानेवर वार करुन जबर जखमी केले होते.

संशयित सराईत गुन्हेगार

संशयित ओम् आणि त्याची मैत्रिण ऐश्वर्या आडगावकर यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अनेक गुन्ह्यात ते जामीनावर आहेत. ८ एप्रिल २०२४ रोजी रात्री संशयित एैश्वर्या, ओम्, तवीन ठक्कर हे जुन्या पाेलीस आयुक्तालयासमाेरील याहू हाॅटेलमध्ये मद्यपार्टी करत हाेते. त्यावेळी पार्टी केल्यावर जेवण व मद्याचे बिल देण्यावरुन संशयितांनी तुफान राडा घातला हाेता. एैश्वर्यासह ओम् व इतरांनी तवीन या मित्रास मारहाण करुन चाकूसदृश हत्याराने वार केले हाेते. याप्रकरणीही सरकारवाडा पाेलीसांत गुन्हा दाखल आहे. तर, एैश्वया हिच्यावर आयफाेन माेबाईल चाेरीचाही गुन्हा सरकारवाडा पाेलीस ठाण्यात दाखल आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT