Nashik News : इंदिरानगर परिसरातील कोटक महिंद्रा बँकेतील भरण्यात ५०० रुपयांच्या १३ बनावट नोटा आल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या संदर्भात पोलिसांनी अकोले (जि. नगर) येथील हॉस्पिटलकडे चौकशी केली आहे. परंतु अद्याप बनावट नोटांसंदर्भात ठोस अशी काही माहिती मिळू शकलेली नाही. या नोटा याच हॉस्पिटलमधून मेडिक्लेमच्या पैशातून अज्ञात संशयिताने दिल्या होत्या. (Crime Inquiry to hospital in case of fake Currency)
इंदिरानगर पोलिस ठाण्यामध्ये ३ जूनला कोटक महिंद्रा बँकेत बनावट नोटा आढळून आल्या होत्या. शाखा व्यवस्थापक स्वप्नील नगरकर (रा. पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, मेडिक्लेम व इन्श्युरंस संदर्भाने काम करणारे सुबोध सुधीर रत्नपारखे ( रा. वडाळा-पाथर्डी रोड) हे सकाळी पैशांचा भरणा करण्यासाठी आले.
त्या वेळी त्यांच्याकडे असलेल्या पैशांमध्ये ५०० रुपयांच्या १३ बनावट चलनी नोटा असल्याचे निदर्शनास आले. या नोटा त्यांना नगर जिल्ह्यातील अकोले हॉस्पिटलमधून मेडिक्लेमचे पैसे भरताना अज्ञाताने दिल्या होत्या. (latest marathi news)
या नोटा बनावट असल्याचा संशय असल्याने रत्नपारखे व बँकेच्या कॅशिअर अंकिता गायकवाड यांनी शाखा व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकांनी इंदिरानगर पोलिसात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी तपासात अकोले येथील हॉस्पिटलमध्ये नोटा कुणी.
कधी व केव्हा आणल्या, त्यांचा भरणा रुग्णालयातून रत्नपारखे यांच्याकडे कसा आला याचा तपास करीत आहेत. तांत्रिक विश्लेषणातून सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी सुरू आहे. हॉस्पिटलमधील स्टाफ, अकाउंटंट, डॉक्टर यांची चौकशी करण्यात आली आहे. यातून या बनावट नोटांचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.