Drugs Crime esakal
नाशिक

Nashik MD Drug Case : ‘एमडी’ ड्रग्जसचा तपास ‘कासव’गतीने; दोघांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात

Crime News : गुन्ह्यांमध्ये अद्यापही संशयित पेडलर्सने एमडी ड्रग्स्‌ आणले कोठून, हा प्रश्न कायम राहिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : गेल्या आठवड्यामध्ये शहर पोलीस गुन्हेशाखेच्या पथकांनी दोन गुन्ह्यांमध्ये एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्स्‌ प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या. मात्र, हे गुन्हे पोलिस ठाण्यांकडे वर्ग केल्याने तपास ‘कासव’गतीने होतो आहे. परिणामी, गुन्हेशाखेने शिताफीने जेरबंद केलेल्या दोघांविरोधात पोलीस तपासात ठोस काही न मिळाल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही गुन्ह्यांमध्ये अद्यापही संशयित पेडलर्सने एमडी ड्रग्स्‌ आणले कोठून, हा प्रश्न कायम राहिला आहे. (Nashik crime Investigation of MD drugs at slow speed)

गेल्या सप्टेंबर महिन्यांपासून शहरात सातत्याने एमडी ड्रग्स्‌चे गुन्हे दाखल होत आहेत. एवढेच नव्हे तर नाशिकरोड परिसरातील शिंदेगावात कारखानेच पोलिसांच्या हाती लागले. तर नाशिकमधीलच सराईत गुन्हेगारांनी सोलापूरात एमडी ड्रग्स्‌चा कारखाना सुरू करून ते नाशिकमध्ये विक्री करीत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. एमडी ड्रग्स्‌चे अड्डे उदध्वस्त करूनही शहरात ड्रग्स्‌ पेडलर्संच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. त्यामुळे शहरात ड्रग्स्‌ येत तरी कोठून, याचा माग काढण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाने गेल्या आठवड्यात १८ तारखेला रविवार कारंजा परिसरातून सापळा रचून संशयित धीरज चांदनानी, रोहित आहिरराव यांना अटक केली होती, तर पखाल रोड परिसरातून संशयित शहबाज पठाण या ड्रग्स्‌ पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या होत्या. या पेडलर्सकडून पोलिसांनी तब्बल साडेचार लाखांचे ९० ग्रॅम एमडी जप्त केली आहे. (latest marathi news)

चांदनानी, आहिरराव यांना अटक करून सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर गुन्हेशाखेने या गुन्हयाचा तपासही सरकारवाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. मात्र, पोलिस कोठडीची मुदत संपेपर्यंत सरकारवाडा पोलिसांना या गुन्ह्यात ठोस तपास करता न आल्याने न्यायालयाने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. पोलिसांच्या कासवगतीच्या तपासामुळे शहरातील एमडी ड्रग्जचे रॅकेटला बळ मिळण्याचीच शक्यता व्यक्त होते आहे.

मुख्य संशयितापर्यंत हात जाईना

ललित पाटीलच्या शिंदेगावातील कारखान्यातील ड्रग्स्‌ मुंबईत विक्रीला जायचे. सनी पगारेच्या टोळीने सोलापूरात कारखाना सुरू केला असता, ते नाशिकमध्ये विक्री करीत. मात्र त्यानंतर जे ड्रग्स पेडलर्स नाशिक पोलिसांनी पकडले, त्या सर्वांनी एमडी ड्रग्स्‌ मुंबईतून नाशिकमध्ये आणल्याचे समोर येते आहे.

परंतु अद्यापही शहर पोलिसांना मुंबईतील म्होरक्यांपर्यंत पोहोचता आलेले नाही. त्यात एमडीसारखे गंभीर तपासाकामी पोलीस ठाण्यांच्या पथकाकडे गेल्याने तपास कासवगतीने नव्हे तर ते रेंगाळण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून ड्रग्स्‌चे रॅकेट चालविणारे म्होरके पोलिसांच्या हाती लागतील का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT