Nashik Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : वृद्धेच्या खुनातील संशयित शेजारील असल्याचा निष्पन्न! गुन्हे शाखेकडून शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : म्हसरूळ गावाजवळील गुलमोहरनगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ ८० वर्षीय वृद्ध महिलेचा अज्ञात संशयिताने विळ्याने खून केल्याची घटना बुधवारी (ता. ११ ) घडली. घटनेतील संशयित शेजारच्या असल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले असून, तो फरार झाला आहे. (It turns out that suspect in murder of an old woman is neighbor)

म्हसरूळ पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक, गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी संशयितांचा माग काढत असून संशयित लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. म्हसरूळ गावाजवळील गुलमोहरनगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील राधानंद निवास येथे कुसुम सुरेश एकबोटे ( ८०) या ज्योती गोविंद एकबोटे या मुलीसोबत भाड्याने राहत होत्या.

बुधवारी सकाळी १०. ३० ते ११ वाजेच्या दरम्यान सदर महिला घरात एकटी असताना अज्ञात हल्लेखोराने या वयोवृद्ध महिलेवर विळ्याच्या साहाय्याने डोक्यावर व छातीवर वार करत खून केल्याची घटना घडली.

सदर मयत वृद्ध महिला सकाळी साडेनऊच्या सुमारास परिसरात घंटागाडी आली असता त्या महिलेने वृद्ध महिला कचरा टाकण्यासाठी खाली आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब कर्मचारी, डॉग स्कॉड यांना पाचारण करण्यात आले होते. श्वान गुगलच्या मदतीने अज्ञात हल्लेखोराचा माग काढण्यात पोलीसांना यश आले आहे. (latest marathi news)

तसेच ज्या विळ्याने खून झाला, तो शेजारी राहणाऱ्या घरातलाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवार (ता.११) सायंकाळपर्यंत संशयित ताब्यात मिळाला नसून त्याचा म्हसरूळ गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी कर्मचारी माग काढत आहे.

संशयित नशेबाज व जुगारी

संशयित हा अकरावी नापास असून, तो पूर्वी नर्सरीमध्ये काम करत होता, सध्या तो घरीच होता. संशयितांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून तीन ते चार महिने जेलवारीदेखील झाली आहे. संशयिताचा मित्र परिवार कमी असून संशयित हा जुगारी असल्याचे समजते .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT