Nashik Crime News : जुना गंगापूर नाका येथे असलेल्या आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या शाखेतील लॉकरमधील २२२ ग्राहकांचे सुमारे ५ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरून नेले आहे. सदरची घटना बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Jewellery worth five crore was stolen from bank locker )
जयेश कृष्णदास गुजराथी (रा. खंडेराव नगर, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, ते जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स शाखेचे ॲडमिन मॅनेजर आहेत. शनिवारी (ता. ४) सकाळी शाखेचे मॅनेजर चंद्रकांत मुठेकर यांनी शाखा उघडली. त्यानंतर गोल्डन लोनचे किरण जाधव हे दिवसभर शाखेत काम करीत होते.
सायंकाळी पाऊणे सहाच्या सुमारास ग्राहक त्यांचे सोन्याचे दागिने सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी ग्राहक व क्रेडिट मॅनेजर सिद्धांत इकनकर हे दोघे त्यांच्याकडील चावी घेऊन लॉकर उघडले असता, लॉकर रिकामे होते. ग्राहकाचे लॉकरमधील दागिने गायब होते.
यानंतर तातडीने सीसीटीव्ही तपासले असता, शनिवारी (ता.४) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान, दोघा संशयितांनी बिझनेस मॅनेजरच्या कार्यालयाच्या खिडकीतून आत प्रवेश केला. (latest marathi news)
संशयितांनी सेफ्टी लॉकरच्या चाव्या मिळवून २२२ ग्राहकांचे लॉकरमधील १३,३८५.५३ ग्रॅम सोन्याचे सुमारे ४ कोटी ९२ लाखांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिनेमाला साजेशी चोरी
चोरट्यांनी एखाद्या सिनेमाला साजेसे सदरची घरफोडी केली आहे. २५ ते ३० वयोगटातील दोघे संशयित असून, एकाच्या डोक्यात पांढऱ्या रंगांची हुडी तर दुसऱ्याच्या डोक्यात पांढऱ्या रंगाची टोपी आहे. संशयितांनी लॉकर्सच्या चाव्या शाखेतूनच शोधून २२२ ग्राहकांचे ४ कोटी ९२ लाखांचे दागिने चोरून नेले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.