Nashik News : भुसावळला माजी नगरसेवकासह त्याचा मित्राचा खून केल्याप्रकरणी एका संशयिताला शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई करून संशयिताला भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व काडतुसे जप्त केली आहेत. (Main suspect arrested in bhusawal murder case from nashik)
पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ३०) भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखुंडे कारमधून जात असताना त्यांच्या कारवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी आठ संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील मुख्य संशयित करण किसन पतरोड (२०, रा. ७२ खोली, वाल्मीकनगर, भुसावळ) याला पोलिसांनी अटक केली.
गोळीबारानंतर पतरोड नाशिकमध्ये आला होता. गुरुवारी भद्रकाली हद्दीत गस्त घालणाऱ्या गुंडाविरोधी पथकाचे कर्मचारी अक्षय गांगुर्डे यांना भुसावळातील दुहेरी खुनातील संशयित नाशिकला आल्याची माहिती मिळाली. (latest marathi news)
संशयित करण द्वारका परिसरात थांबल्याचे समजल्यानंतर गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पथकासह द्वारका येथील बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबले. पतरोड या परिसरात येताच पोलिसांनी त्याच्या दिशेने झडप घातली. परंतु तो पळून जाऊ लागला. त्याला पाठलाग करून पोलिसांनी पकडण्यात आले.
त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन कट्टे आणि पाच काडतुसे असा ८४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, डी. के. पवार, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण यांनी कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.