Stolen rickshaw seized. along with a team of the Special Branch of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : रिक्षा चोरणारा अल्पवयीन संशयित ताब्यात; 2 रिक्षा जप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रविशंकर मार्ग परिसरात आलेल्या अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या चौकशीतून त्याने साथीदाराच्या मदतीने शहरातून दोन रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे. मुख्य संशयिताचा पोलीस शोध घेत असून, चोरीची एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. रमजान तांबोळी (रा. विहितगाव) यांनी त्यांची ३० हजारांची रिक्षा ( एमएच १५ एके ५१४६) मुजीफ मनियार (रा. संताजीनगर, बजरंगवाडी) यांना प्रवासी वाहतुकीसाठी चालविण्यास दिलेली होती. (minor suspect of stealing rickshaw arrested 2 rickshaws seized )

गेल्या २८ जुलै रोजी मध्यरात्री सदरची रिक्षा संताजीनगर येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर, नंदा विजय गोवर्धने (रा. श्री श्रद्धा अपार्टमेंट, इंदिरानगर) यांची ५० हजारांची प्रवासी रिक्षा (एमएच १५ झेड २१०३) गेल्या २२ जून रोजी पहाटेच्या ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाचे अंमलदार रवींद्र दिघे यांना संशयित चोर रवीशंकर मार्गावरील वडाळा जॉगींग ट्रॅक याठिकाणी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार विशेष शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. ५) त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मुख्य संशयित तौफिक शहा (रा. लिली व्हाईट स्कुलजवळ, वडाळागाव) याच्या मदतीने मुंबई नाका आणि इंदिरानगर हद्दीतून दोन रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली.

संशयित अल्पवयीन असून, त्याच्याकडून रमजान तांबोळी यांची चोरीस गेलेली रिक्षा (एमएच १५ एके ५१४६) व नंदा गोवर्धने यांची चोरीस गेलेली रिक्षा (एमएच १५ झेड २१०३) जप्त केली आहे. मुख्य संशयित तौफिक शहा याचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कामगिरी विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, योगेश चव्हाण, रवींद्र दिघे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, भगवान जाधव, गणेश वडजे यांच्या पथकाने बजावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfers: निवडणूक आयोगानं झापल्यानंतर आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या! लवकरच जाहीर होणार निवडणूक?

विधानसभेसाठी मनसेच्या तयारीपासून ते टीम इंडियातील खेळाडूला शिक्षेपर्यंत, वाचा आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan नोव्हेंबरमध्ये समोरासमोर? जाणून घ्या कोणती स्पर्धा अन् कुठे भिडणार

Nana Patole: हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का? महायुतीवर नाना पटोले संतापले, काय म्हणाले?

Diwali Special Train: दसरा अन् दिवाळीसाठी मुंबईहून विशेष ट्रेन, जाणून घ्या २६ फेऱ्यांची माहिती

SCROLL FOR NEXT