Suspect arrested in case of murder of youth in Sahwasnagar. A team of Panchvati Police Station along with it. esakal
नाशिक

Nashik Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताला अटक; पंचवटी पोलिसांची क्रांतीनगरमध्ये कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई नाका हद्दीतील कालिका देवी मंदिराच्या पाठीमागील सहवासनगरमध्ये २० वर्षीय युवकाच्या खुनप्रकरणी महिनाभरापासून पसार असलेल्या संशयिताला पंचवटी पोलिसांनी पंचवटीतील क्रांतीनगरमधून अटक केली. सहवासनगरमध्ये १९ एप्रिल रोजी रात्री युवकाचा खून झाला होता. समर्थ दत्तात्रय तायवाडे (२२, रा. क्रांतीनगर, गणेश चौक, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. (Murder suspect arrested by police )

१९ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पियुष भीमाशंकर जाधव (२०, रा. सहवासनगर) यास दहा-बारा जणांच्या टोळक्याने धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या घटनेपासून संशयित समर्थ तायवाडे हा पसार झाला होता. पंचवटी पोलिसांनी संशयित समर्थ हा रविवारी (ता. १२) पंचवटीतील क्रांतीनगर या परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहायक निरीक्षक विलास पडोळकर, संपत जाधव, सागर कुलकर्णी, दीपक नाईक, भोईल, पचलोरे, अनिल गुंबार्डे, युवराज गायकवाड यांनी सापळा रचून रविवारी रात्री आठ वाजता त्यास अटक केली. तपासाकामी त्यास मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT