Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : गंगापूर हद्दीत अनोळखी युवकाचा खून! पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू

Nashik Latest News : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोतीवाला कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक पडीक जागेवर एका ३० ते ३५ वर्षे अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोतीवाला कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक पडीक जागेवर एका ३० ते ३५ वर्षे अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. मृताच्या पोटावर धारदार हत्यारांनी वार केल्याचे दिसून येत असून मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. दरम्यान गेल्या दोन दिवसांत खुनाच्या तीन घटना घडल्याने नाशिक शहर हादरले आहे. (Nashik Murder of unknown youth in Gangapur area)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.१९) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास मोतीवाला कॉलेजकडून ध्रुवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पडीक जागेत मृतदेह आढळल्याचे पोलिसांना समजले.

माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हा खून रविवारी रात्री वा सोमवारी पहाटे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नसून पोलिस बेपत्ता नोंदणीसह माहिती घेत आहेत.

मृतदेह पंचनामा करून विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

दोन दिवसांत तीन खून

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या दोन दिवसांत खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. रविवारी पहाटे नाशिक रोड परिसरात एकलहरे रोडवर चेतन ठमके या सराईत गुन्हेगाराचा खून झाला तर सोमवारी दुपारी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत इमारतीमध्ये विवाहितेचा खून करून गोणीत मृतदेह सापडला.

त्यानंतर सायंकाळी गंगापूर हद्दीत अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. एका पाठोपाठ या तीन घटनांमुळे नाशिक शहर हादरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT