Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : पर्यटकांना चंदीगढला सोडून ट्रॅव्हल एजंट पसार; फसवणुकीचा गुन्हा

Fraud Crime : नाशिक तेथून कुल्लू मनाली ट्रीपसाठी घेऊन गेलेल्या ३६ पर्यटकांना चंदीगढ विमानतळावर सोडून संशयित ट्रॅव्हल एजंट पसार झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : नाशिक तेथून कुल्लू मनाली ट्रीपसाठी घेऊन गेलेल्या ३६ पर्यटकांना चंदीगढ विमानतळावर सोडून संशयित ट्रॅव्हल एजंट पसार झाला. त्यामुळे संपूर्ण ट्रीपचा खर्च पर्यटकांनी स्वत: करीत नाशिक गाठले असून, संशयित ट्रॅव्हल एजंटविरोधात पावणे चार लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल करण्यात आला आहे. राजीव मदनलाल चंदा (४०, रा. ओमकार हाईट, इंदिरानगर) असे संशयित ट्रॅव्हल एजंटचे नाव आहे. (Crime of fraud spread by travel agents leaving tourists to Chandigarh )

शुभांगी हेमंत बडगुजर (रा. शकुंतला हाईटस्‌, जनक नगरी, कामठवाडे) यांच्या फिर्यादीनुसार, १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान संशयित एजंट राजीव चंदा याने नाशिक ते कुल्लू मनाली व कुल्लू मनाली ते नाशिक अशी चार दिवसांची ट्रीपचे नियोजन केले होते. यासाठी फिर्यादी शुभांगी यांच्यासह शहर-परिसरातील ३६ पर्यटकांनी नाशिक ते कुल्लु मनाली आणि परत नाशिक अशा ट्रीपसाठी नोंदणी निश्चित केलेली होती.

या सहलीसाठी या ३६ पर्यटकांकडून संशयित एजंटने ५ लाख ३३ हजार रुपये घेतले होते. यात विमान प्रवास, हॉटेलचे बुकिंग आणि जेवणाचाही खर्च समाविष्ट होता. १२ जानेवारीला संशयित एजंट मुंबई येथून चंदीगढसाठी विमानाने घेऊन गेला. पर्यटकांना चंदीगढ विमानतळावर सोडले आणि तो पसार झाला. त्यानंतर पर्यटकांसाठी निश्चित केलेल्या हॉटेलमध्ये पर्यटक गेले असता, त्याठिकाणी त्यांची बुकिंग करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले. (latest marathi news)

त्यामुळे पर्यटकांनी संशयित एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणाचेही फोन कॉल स्वीकारले नाहीत. नंतर संपर्क झाला असता, त्याने ‘तुम्ही बुकिंग करून घ्या, मी तुम्हाला पैसे देतो’ असे पर्यटकांना सांगितले. त्यानंतर पर्यटकांनीच पैसे भरून हॉटेल बुक केले. मनालीत फिरण्यासाठी केलेल्या बसचेही भाडे पर्यटकांनीच भरले. परतीच्या प्रवासातही संशयित एजंट राजीव चंदा याने पर्यटकांच्या परतीच्या विमान प्रवासाचे तिकिटे काढलेली नव्हती.

यावरुन पर्यटकांनी श्री. चंदा यांच्यासोबत वाद झाला असता संशयित पसार झाला. त्यानंतर पर्यटकांनी कसेबसे मुंबई व मुंबईवरून नाशिक गाठले. त्यासाठी या ३६ पर्यटकांना ३ लाख ६५ हजार रुपयांचा खर्च आला. यामुळे मनस्ताप झालेल्या पर्यटकांनी संशयित एजंटकडे खर्च झालेल्या रकमेची मागणी केली असता एजंटने उडवाउडवी केल्याने अखेर सर्व पर्यटकांनी राजीव चंदा यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT