Brutally mutilated animals in trucks transporting cattle illegally by Jaikheda police at Kotbel (Baghlan). esakal
नाशिक

Nashik Crime News : कोटबेलला कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Crime News : कोटबेल (ता. बागलाण) येथे जनावरांची ट्रकमध्ये निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणार्‍या वाहनावर जायखेडा पोलिसांनी कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

नामपूर : कोटबेल (ता. बागलाण) येथे जनावरांची ट्रकमध्ये निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणार्‍या वाहनावर जायखेडा पोलिसांनी कारवाई केली. १४ गोवंश जनावरे बेकायदेशीरपणे, क्रूरतेने पाय तोंड बांधून, कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तीन संशयित आरोपीसह १० लाख २५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदरची कारवाई मंगळवारी (ता. २६) पहाटे सहा वाजेच्या दरम्यान करण्यात आली. (Nashik Crime Police action against illegal transport of animals for slaughter to Kotbel marathi news psl98)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती जायखेड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार कोटबेल गावात टाटा मालट्रक क्रमांक एमएच १२ जीटी ७००० या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये निर्दयेतेने कोंबुन भरलेल्या अवस्थेत सुमारे गाय, गोऱ्हे, वासरी, अशी जनावरे आढळून आले. याबाबत सदर जनावरांच्या खरेदी विक्री बाबत कागदपत्रे तसेच वाहतुकीचा परवाना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीसांनी गाडी थांबविण्याचा इशारा केला असता सदर गाडी भरधाव वेगाने पळवून नेल्याने गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सदर वाहन पंचासमक्ष जप्त करुन पोलिस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले. (latest marathi news)

सदर आरोपीवर प्राण्यांना क्रुरपणे वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत महाराष्ट्र प्राणी सरंक्षण सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ५ (अ) चे उल्लंघन ९ प्रमाणे व भारताचा प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबतचा अधिनियम १९६० चे कलम ११, मोटार वाहन कायदा कलम २३९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

शेख शाहीद शेख रशिद, (वय २३) व्यवसाय- मजुरी, रा. सलाम चाचा रोड, मालेगाव, मोहम्मद अय्युब अब्दुल वदुद, (वय २४) वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, एम. एच. बी. कॉलनी, रुम नं. १४५, हजार खोली, मालेगाव, अशपाक पतला, (पुर्ण नाव गाव माहित नाही) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादी शिपाई अरुण वन्से यांनी फिर्याद दिली असून हवालदार भगरे, नाईक पवार पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT