Nashik Crime News : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी सज्ज झालेली असताना, दुसरीकडे कोयत्यासारखे तीक्ष्ण हत्यारे बाळगणाऱ्या तिघांच्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अंबड हद्दीतील सिडको आणि कामटवाडा गावातून मुसक्या आवळल्या आहेत. यातील दोघे १७ वर्षीय अल्पवयीन संशयित आहेत. (Nashik crime accused arrested with Sharp weapons marathi news )
आकाश प्रल्हाद आव्हाड यास सिडकोतील गणेश चौकातून तर दोघा अल्पवयीन संशयितांना कामटवाडा गावातून स्वत:जवळ तीक्ष्ण कोयते बाळगताना पोलिसांनी अटक केली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पथक कामटवाडा परिसरामध्ये गस्तीवर होते. त्यावेळी अंमलदार खांडबहाले यांना दोन संशयित हे स्वत:जवळ कोयते बाळगून असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार, रविवारी (ता. १७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पथकाने कामटवाडा गावातील सार्वजनिक शौचालयासमोरील मोकळ्या गार्डनजवळ दोघे संशयित आढळून आले. पोलिसांनी हेरून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता दोघांकडे तीक्षण धारदार कोयदे मिळून आले. दोघेही संशयित हे १७ वर्षीय विधीसंघर्षित बालके आहेत.(latest marathi news)
तर, दुसर्या घटनेमध्ये पथकाचे अंमलदार स्वप्निल जुंद्रे यांना संशयित आकाश प्रल्हाद आव्हाड (१९, रा. गणेश चौक, सिडको) याच्याकडे कोयता असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने रविवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गणेश चौकातील मयुरी गार्डनच्या आडोशाला असताना ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीक्ष्ण कोयता आढळून आला. पथकाने त्यास अटक केली आहे. या दोन्ही प्रकरणात अंबड पोलिसात फिर्याद देत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाकाबंदीच्या सूचना
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस सतर्क झाले आहेत. आयुक्तांनी पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत नाकाबंदी करीत वाहनांच्या तपासणी केली जात आहेत. निवडणुक काळात अवैध मद्यतस्करीसह गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस सतर्क झाले असून, त्यासाठीच नाकाबंदी व पोलिस गस्तीवर भर पोलिसांकडून दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.