Nashik Bribe Crime News : कारागृहातील बंदीला फिटफॉर प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणार्या कारागृहातील वैद्यकीय रुग्णालयातील दोघा डॉक्टरांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दोघा लाचखोरांच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडती घेतली. यात स्थावर मालमत्तेची कागदपत्रे सापडली असून त्यांच्या मूळगावी असलेल्या मालमत्तेचा पथके शोध घेत आहेत. (Crime Two bribe taking doctors in jail)
डॉ. आबिद आबू अत्तार (४०, रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत, नाशिकरोड), डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (४२, रा. इंदिरानगर, नाशिक) असे दोघे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह रुग्णालयाचे लाचखोर वैद्यकीय अधिकारी आहेत. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या बंदीला फिटफॉर प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यासाठी बंदीच्या मित्राने कारागृह रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे प्रमाणपत्राची मागणी केली असता, लाचखोरांची ४० हजारांची मागणी केली होती.
तडजोडी अंती ३० हजार देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ‘लाचलुचपत’च्या पथकाने सापळा रचून दोघा लाचखोर डॉक्टरांना ३० हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. यप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल आहे. (latest marathi news)
दरम्यान, सापळा यशस्वी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघा लाचखोरांच्या घराची झडती घेतली असून, डॉ. अन्सारी याच्याकडे तीन साडेतीन लाखांच्या स्थावर मालमत्तेची तर, डॉ. खैरनार याच्याकडे सात लाखांच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहे.
परंतु या दोघाही लाचखोरांच्या मूळ गावी पथकांकडून त्यांच्या स्थावर मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे. सदरील गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.