Matka Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : मानुरला अवैध मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Crime News : आंब्याच्या झाडाखाली राजरोज सुरू असलेल्या अनाधिकृत मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम जप्त करून सदर इसमाविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा, - दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील मानूर येथे उपविभागीय पोलीस आधिकारी नितिन गणापूरे यांच्या पथकाने डोंगराच्या कडेला आंब्याच्या झाडाखाली राजरोज सुरू असलेल्या अनाधिकृत मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम जप्त करून सदर इसमाविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (Crime Police raid at Manur illegal matka gambling den)

परिसरातील अनाधिकृत व्यवसायांचे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलिसांकडून होत असलेल्या छापेमारीमुळे अवैध व्यावसाय चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधीक्षक नितिन गणापूरे यांच्या पथकातील पोलीस हवालदार जिभाऊ बागुल, संतोष कन्नोर, पप्पु आहिरे यांना श्री. गणापूर यांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानूर येथे डोंगराच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बिनबोभाट दोन ते तीन इसम मिलन कल्याण नावाचा मटका जुगाराचा खेळ खेळवत असल्याने कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकण्यासाठी दोन पंचांच्या मदतीने खाजगी वाहनातून थेट मानूर गावातील डोंगरांच्या अलीकडेच वाहन उभे करून पायी चालत आंब्याच्या झाडाखाली मोकळ्या जागेत दोन इसम अकड्यावर पैसे लावून मिलन कल्याण नावाचा जुगाराचा खेळ खेळताना आढळून आले. (latest marathi news)

साध्या वेशातील पोलिसांनी अनाधिकृत चालविणाऱ्या मटका अड्ड्यावर छापा टाकून त्यास पकडले व एक अनोळखी इसमाने पळ काढला. पकडलेल्या जुगार चालकाला पोलीसांनी विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेतली असता राजू मुन्नालाल भोई (रा.पिपळनेर, ता.साक्री) असे सांगितले व मालक सागर कैलास जयस्वाल (रा.पिपळनेर, ता.साक्री) यांच्या सांगण्यावरून सदर मटका चालवत असल्याची कबूली दिली.

सदर इसमाची पोलिसांनी झडती घेतली असता दहा हजार एकशेवीस रूपये, आकडे लिहिण्यासाठी पेन, दोन पुस्तक व कार्बन असा ऐवज मिळून आला. पोलिसांनी दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून अवैध व्यावसायिकांवर कारवाई सुरूच राहणार असे उपविभागीय पोलीस आधिकारी नितिन गणापूरे यांनी सागितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT