Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : दरमहा पैसे घेणारा पोलिस ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Bribe Crime : कॅफेचालकांकडून दरमहा तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली.

सकाळ वृतसेवा

Nashik Bribe Crime : ‘कॉलेज परिसरात कॅफे चालवून विद्यार्थ्यांना आडोसा करून देतो, तुझ्यावर कारवाई करतो’, असे धमकावत कॅफेचालकांकडून दरमहा तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली. लाचखोर गोसावी हा आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत आहे. (nashik crime policeman bribery From cafe operators marathi news)

तक्रारदार याचे शहरातील एका कॉलेजच्या परिसरामध्ये कॅफे आहे. याठिकाणी जोडप्यांना आडोसा मिळावा, यासाठी विभागणी केलेली होती. सहा महिन्यांपूर्वी लाचखोर गोसावी याने कॅफेचालकाची भेट घेत कारवाईचा दम देत त्याच्याकडून दरमहा दोन ते तीन हजार रुपये लाच घेत होता. (latest marathi news)

यामुळे त्रस्त झालेल्या कॅफेचालकाने गोसावी यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. संशयित गोसावी हा विशेष शाखेत कार्यरत असतानाही त्याने संबंध नसतानाही कॅफेचालकाकडे लाच मागितल्याचे उघड झाले.

बुधवारी (ता. ६) तक्रारदार यांच्याकडून दोन हजार ५०० रुपये लाचची मागणी करून ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस नाईक गणेश निंबाळकर, शिपाई नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कारवाई केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT