Nashik Crime News : सामाजिक कार्यकर्ते व ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबारप्रकरणी फरारी असलेल्या दीपक बडगुजरसह अटकेतील सहा संशयितांविरोधात मोक्का लावण्याचा प्रस्ताव पोलिसांनी सादर केल्याची माहिती न्यायालयास देण्यात आली. दीपक बडगुजर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी (ता. १०) न्यायालयात सुनावणी होऊन शुक्रवारी (ता. ११) निकाल देण्याची शक्यता आहे. (Verdict on dipak Badgujar bail application today)
१४ फेब्रुवारी २०२२ ला रात्री सिडकोतील उत्तमनगरमध्ये ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर मोपेडवरून आलेल्या संशयितांनी गोळीबार केला होता. यात ते थोडक्यात बचावले होते. दोन वर्षे उलटूनही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान, गेल्या महिन्यात गुंडाविरोधी पथकाने आकाश सूर्यतळ यास अटक केल्यानंतर गुन्ह्याची उकल झाली.
मयूर बेद, श्रीकांत वाकोडे ऊर्फ बारक्या (रा. जेतवननगर), सनी पगारे, अंकुश शेवाळे, प्रसाद शिंदे यांना अटक केली आहे, तर संशयितांच्या चौकशीतून दीपक बडगुजर याचे नाव समोर आले. मात्र, तो गेल्या तीन आठवड्यांपासून फरारी आहे. (latest marathi news)
अटकपूर्व जामिनावर सुनावणी
दीपक बडगुजर याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होऊन बचाव व सरकार पक्षातर्फे युक्तिवाद झाले. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, शुक्रवारी निकाल देण्याची शक्यता आहे. तपासी अधिकाऱ्यांनी फरारी संशयित दीपक बडगुजरसह सहा संशयितांविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी पोलिस आयुक्तांकडे सादर केल्याची माहिती न्यायालयास दिली. त्यामुळे संशयितांवर लवकरच मोक्का लावण्यात येणार आहे. दीपक बडगुजर याचा शहर पोलिस कसून शोध घेत असून, तो परराज्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.