crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : मतदान केंद्र प्रमुखांवर हल्ला करण्याचा प्रयत्न; म्हसरूळ पोलिस ठाण्यात, पती, पत्नीसह मुलावर गुन्हा

Nashik Crime : पती, पत्नीसह मुलावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचा गुन्हा म्हसरूळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : परिसरातील के. के. वाघ इंग्लिश स्कूल, सरस्वती नगर येथील बूथ क्र. ८८ वर मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना रांगेमधून सर्व मतदारांना ओलांडून बूथमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती, पत्नीस रांगेमध्ये येण्याची विनंती करीत असलेल्या केंद्र प्रमुखास अरेरावी करत, धक्काबुक्की करत जीव मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती, पत्नीसह मुलावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचा गुन्हा म्हसरूळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. ( Crime registered against family due to Attempted attack on polling station chief )

अरुण सरदारसिंग परदेशी (वय ६०), अक्षय अरुण परदेशी (वय २४, रा. फ्लॅट नंबर ओ २४, सुशिलनगरी, माने नगर, रासबिहारी रोड, म्हसरूळ) असे संशयितांची नावे असून, यात एका महिलेचा समावेश आहे. सरस्वती नगर येथील के. के. वाघ इंग्लिश स्कूल येथे मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना पती, पत्नीसह त्यांच्या मुलाने गोंधळ घातला. मतदान केंद्र प्रमुखांशी अरेरावी करत 'तु बाहेर ये, तुझे तोंडामध्ये दोन थोबाडीत देतो.

तू काम संपवून बाहेर ये मग तुझ्याकडे पाहतो. अशी धमकी दिली. तर केंद्रप्रमुखाने ही बाब म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांना सांगितली. काही पोलिस अधिकाऱ्यांनी पती, पत्नीस समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असता पत्नीने पायातील चप्पल काढून पोलिस अधिकाऱ्यावर धावून जाऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तसेच पोलिस अधिकारी व अंमलदार यांना शिवीगाळ केली. डीजी ऑफिसमध्ये माझे भाऊ आहेत.

मी तुला त्यांचेसमोर हजर करतो. मी तुझ्याकडे पाहून घेतो अशी धमकी दिली. केंद्रप्रमुख पोलिस वाहनातून कॉलेजच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडत प्रकरण शांत होण्यासाठी काही काळ रस्त्याचे बाजूला थांबलो असता पती, पत्नीने पुन्हा पोलिसांच्या वाहनाजवळ जात दरवाजा उघडून त्यास बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात सुहास विलास धारणे (वय ४९, रा. फ्लॅट नं ३, हर्षवर्धन सोसायटी, मखमलाबाद नाका) यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांद्यानी केला नवं मतदाराचा वांदा

आजकाल तरुण तरुणी या सोशल मीडियावर व्हायरल करून फेमस होण्यासाठी आतुर असतात. निवडणुकीपूर्वी पिंपळगाव येथे झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये एका युवक शेतकऱ्यांनी कांद्याचा प्रश्नावर बोला असे भर सभेत बोलत लक्ष वेधून घेतले होते. अक्षरशः या युवक शेतकऱ्याची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी घेतली होती.

यामुळे कांद्याची माळ व कांदा हे एक फेमस होण्याचे साधन झाले आहे. सोमवारी सीडीओ मेरी शाळा येथील मतदान केंद्रावर एका नवमतदाराने ईव्हीएम मशीन समोर कांदा ठेवून छायाचित्र काढला आणि मतदान केंद्रातील अधिकारी यांनी पोलिसांना पाचारण करत, घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शांतिगिरी महाराजांच्या भक्तांविरुद्ध तक्रार

एकलव्य निवासी आश्रमशाळा या मतदान केंद्रामध्ये दुपारच्या सुमारास अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचे समर्थक शिवम् संजय दाभाडे, विजय सुभाष दाभाडे व अजय सुभाष दाभाडे हे शांतीगिरी महाराज यांची बादली ही निशाणी असलेली त्यांचे नाव असलेल्या चिठ्ठ्या मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसराच्या आतमध्ये वाटप करत असताना आढळून आले.

याबाबत त्यांना समज देण्यात आली होती; परंतु त्यांनी पोलिसांनी दिलेल्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर पुन्हा ते मतदान केंद्र परिसरात फिरताना आढळल्यामुळे त्यांचेवर पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT