Nashik Crime News : आडगाव शिवारातील शिंदे वस्ती रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश २३ जनावरांची सुटका करण्यात आली आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने १ लाख ६४ हजारांची गोवंशीय जनावरांची सुटका केली असून, एकाला अटक करण्यात आली आहे. (Nashik Crime Rescue of slaughtered cattle from Adgaon)
रशिद ईस्माईल सय्यद (५०, रा. जुना पाझर तलाव, आडगाव शिवार) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार ज्ञानेश्वर कहांडळ, निखील वाघचौरे, इरफान शेख व अमोल देशमुख हे गस्तीवर असताना त्यांना गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची खबर मिळाली होती.
वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सदरची माहिती दिल्यानंतर, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव यांच्या सूचनेनुसार, जुना पाझर तलाव रोडवरील चारी नं. १५ जवळ असलेल्या शिंदे वस्ती रोडवर सापळा रचण्यात आला.
सहायक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक प्रवीण दाइंगडे, मयूर निकम, सहायक उपनिरीक्षक अभिमन्यू गायकवाड, अशोक वस्ते, अंमलदार सुरेश नरवडे, दिनेश गुंबाडे यांच्या पथकाने एका शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. त्यावेळी त्याठिकाणी अत्यंत निर्दयीपणे, दाटीवाटीने गोवंश जातीचे २३ जनावरे डांबून ठेवण्यात आलेली होती. (latest marathi news)
यात २३ गायी व गोऱ्हेंचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात संशयित कुरेशी यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. सदरच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आडगाव पोलिसांचे कौतूक केले आहे.
इंदिरानगरमध्ये कारवाई
दरम्यान, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अंमलदार दीपक पाटील यांच्या पथकाने वडाळा गाव परिसरात छापा टाकून पिकअप वाहनासह गोवंश जातीचे दोन गोऱ्हे ताब्यात घेत कारवाई केली आहे. या प्रकरणी समीर इस्माल शेख (२२, रा. भय्यावाडी, रंगरेज मळा, वडाळागाव) यास अटक करुन इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.