Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : गोदाघाटावरील गुन्हेगारीत वाढ; लुटमारीच्या घटनांनी भितीचे वातावरण

Crime News : पंचवटी पोलिस स्टेशनच्या आधिपत्याखालील सरदार चौक पोलिस चौकी बरेच वेळा बंदच असल्याने गुन्हा घडला तरी अनेकजण पोलिसात न जाणे पसंत करतात.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गोदाघाटावरील हाणामाऱ्या, लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीने येथील स्थानिकांसह व्यावसायिकांत भितीचे वातावरण आहे. दुसरीकडे या भागात नशेचे साहित्य सहज उपलब्ध होत असल्याने तरूणाईतील व्यसनाधिनता वाढत आहे.

गोदाघाटावर पंचवटी पोलिस ठाण्याची सीमा आहे. मात्र येथून पंचवटी पोलिस ठाणे दूर आहे. परंतु पंचवटी पोलिस स्टेशनच्या आधिपत्याखालील सरदार चौक पोलिस चौकी बरेच वेळा बंदच असल्याने गुन्हा घडला तरी अनेकजण पोलिसात न जाणे पसंत करतात. (Nashik Crime Rise in crime at Godaghat)

लुटमारीसाठी अनोखी शक्कल

रात्रीच्यावेळी एखादी तरुणी फिरावयास म्हणून बाहेर पडते, तेव्हा तिच्याबरोबरचे सहकारी आपसांत ओळख नसल्याचे भासवत तिची छेड काढता. तेव्हा त्याठिकाणाहून जाणाऱ्या एकटया नागरिकांच्या हे निदर्शनास आल्यावर ते संबंधित तरुणांना हटकण्याचा प्रयत्न करतात.

त्यावेळी तरूणी व छेडखानी करणारे सर्व एकत्रच असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे संबंधितांकडील मोबाईल, रोख पैसे लांबविले जात असल्याचा अनुभव एकाने कथन केला. पोलिस स्टेशन दूर असल्याने असे प्रकार बिनबोभाट सुरू असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. (latest marathi news)

आठवडे बाजार ठरतोय लक्ष्य

गोदाघाटावर दर बुधवारी पारंपारिक आठवडे बाजार भरतो. स्वस्त व ताज्या भाज्या मिळत असल्याने येथे खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. सायंकाळनंतर तर गर्दीत मोठी वाढ होते, हीच संधी साधत रोख पैशासह स्त्रियांच्या गळ्यातील दागिणे, मोबाईल चोरट्यांकडून हातोहात लांबविले जातात. या चोरट्यामध्ये अल्पवयीन मोठ्या प्रमाणावर सहभागी असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT