Police Inspector Bajirao Pawar Assistant Police Inspector Ujwal Singh Rajput and other staff along with the suspected accused after being arrested by Satana Police. esakal
नाशिक

Nashik Crime News : दुकाने फोडणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात सटाणा पोलिसांना यश

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज ते बसस्थानकादरम्यान असलेल्या एम.एम.स्वीट व अंबिका स्वीट या दोन दुकानांचे गेल्या पाच दिवसांपूर्वी मध्यरात्री शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील तब्बल साडेपाच लाख रुपयांची रक्कम चोरून पोबारा करणाऱ्या अट्टल चोरट्यास सटाणा पोलिसांना काजळा (जि.जालना) येथून अटक करण्यात यश आले आहे. (Satana Police Succeeded In Arresting Thief Who robbed Shop)

या अटकेमुळे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गेल्या सोमवार (ता.६) रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने शहरातील एम.एम.स्वीट व अंबिका स्वीट या दोन दुकानांचे कुलूप तोडून पाच लाख ४५ हजार रुपयांची रक्कम चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपूत यांच्याकडे चोरीचा तपास सोपविला. श्री. राजपूत यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्याने गुप्त बतमीदाराकडून त्यांना ही चोरी शिवाजी सुभाष बरडे (वय ३५, रा.काजळा ता.बदनापूर जि.जालना) याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक श्री.पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राजपुत यांनी बदनापूर येथे रवाना झाले.

काजळा या गावी गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी बरडे याचा शोध घेऊन त्याला अटक केली असता पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीच्या रक्कमेतून त्याने विकत घेतलेली एक लाख १४ हजार ३०० रुपयांची होंडा शाईन (नोंदणी क्रमांक नसलेली) व रोख एक लाख १५ हजार ५०० रुपये असा एकूण दोन लाख २९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. (latest marathi news)

या तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राजपूत, पोलीस हवालदार योगेश शेवाळे, रुपेश ठोके, नितीन जगताप, रवींद्र शिंदे, सिकंदर कोळी, भूषण सूर्यवंशी यांचा समावेश होता. दरम्यान संशयित आरोपी शिवाजी बरडे वर यापूर्वी जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाणे, पैठण पोलीस ठाणे.

छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलीस ठाणे व करमाड या पोलीस ठाण्यांमध्ये अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सुद्धा असेच गुन्हे केले असल्याच्या अनुषंगाने यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता असून त्याच्या उर्वरित साथीदारांचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक श्री. पोवार यांनी सांगितले.

*नागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी कळवावे

"सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अनेक जण उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत असल्याने बाहेरगावी फिरण्यासाठी किंवा नातेवाईकांकडे जात आहेत. त्यामुळे असे बाहेरगावी जाणारे घरांच्या शोधात चोरटे असतात. त्याचा फायदा घेत चोरी करतात. बाहेरगावी जाण्याअगोदर शेजारील लोकांना नातेवाईकांना पोलिसांना माहिती दिल्यास पोलीस त्या घराजवळ पेट्रोलिंग करतील. तरी नागरिकांनी सतर्क रहावे." - बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक, सटाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT