Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : स्वयंघोषित भाईच्या पंटरचा पानटपरीवर राडा! धारदार तलवारी नाचवत टपरीचालकाला दिली धमकी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : म्हसरुळ गावातील पानटपरीवर हातात धारदार तलवारी घेऊन स्वयंघोषित भाईच्या पंटरांनी, ‘युवराज भाईंनी तंबाखूच्या पुड्या मागितल्या आहेत, त्या दे’ असे म्हणत राडा घातल्याचा प्रकार घडला. टपरी चालकाने पुड्या देताना नाक मुरडताच, संशयित पंटरांनी काही वेळाने हातात धारदार तलवारी घेऊन परत पानटपरीवर आले आणि त्यांनी टपरीचालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. (Nashik Crime Self proclaimed Bhai punter terrorise people Pantapari)

वैभव आणि सिद्धार्थ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा संशतियांची नावे आहेत. भूषण कैलास देशमुख (रा. मार्गारेट टाॅवर, शरणपूर गावठाण, कॅनडा कॉर्नर) याच्या फिर्यादीनुसार, त्याचे म्हसरुळ गावातील जैन मंदिराजवळ गणेश पान स्टाॅल आहे. भूषण याची परिसरातील युवराज सोनवणे, वैभव व सिद्धार्थ यांच्याशी ओळख झाली आहे.

ते नेहमी टपरीवर येऊन गुटखा, बार, सिगारेट नेत. मंगळवारी (ता.२५) सायंकाळी सहा वाजता भूषण हा तवली फाट्यावरुन मोटारसायकलने टपरीवर येत असतांना त्याचा भाऊ हर्षद देशमुख हा टपरीवर हाेता. त्याने भूषणला फोन करुन टपरीवर दोन ते तीन तरुण आले आहे. ते म्हणताय की, ‘युवराज अण्णाने दोन-तीन तंबाखुच्या पुड्या मागितल्या आहेत,’ असे सांगितले.

त्यानंतर भूषणच्या फोनवर युवराज सोनवणेचा मित्र भूषणशी बोलू लागला. त्याने ‘युवराज आण्णाला तंबाखुच्या पुड्या दे’, त्यावेळी भूषणने युवराजच्या मित्रास ‘पुड्याच कशाला, संपूर्ण पुडाच घेऊन जा’ असे म्हणाला आणि भाऊ हर्षद याला उभ्या असलेल्या तरुणांना तीन तंबाखुच्या पुड्या देण्यास सांगितले. (latest marathi news)

त्यानंतर पुड्या घेऊन हे तिघे तरुण निघून गेले. तोपर्यंत भूषण हा टपरीवर एकटा असतांना रात्री आठ वाजता युवराज सोनवणेचा साथीदार वैभव व सिद्धार्थ हे टपरीवर आले. त्यांनी हातातील तलवार टपरीच्या कांउटरवर आपटून धमकी देत, ‘तु आमच्या युवराज भाईला शिवीगाळ करतो?, असे म्हणूण शिवीगाळ केली आणि ‘तु टपरीच्या बाहेर ये, युवराज भाईने आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवले आहे,’ असे म्हटले.

मात्र, भूषण हा टपरीबाहेर येत नसल्याने संशयितांनी तलवारी नाचवून टपरीतील साहित्याचे नुकसान केले. माल बाहेर फेकुन दिला. यानंतर जीवे मारण्याची धमकी देत ते दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संशयितांचा शाेध सुरु असल्याचे उपनिरीक्षक दीपक पटारे यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

IND vs PAK T20WC : what a ball…! पाकिस्तान संघाला पहिल्याच षटकात धक्का, Renuka Singh ने उडवला त्रिफळा, Video

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE Updates - 'बिग बॉस मराठीच्या शूटिंगला सुरुवात; कोण कितव्या स्थानावर?

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

Maharashtra Politics: मोदींचं मंदिर बांधलेला भक्त सावध झाला; भाजपला मात्र 'राम राम' ठोकला

SCROLL FOR NEXT