Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : मोहदरी घाटात साडे सात लाख रुपये लुटले! दुचाकीस्वाराला 6 जणांनी मारहाण करीत पळविला ऐवज

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक पुणे महामार्गावर मोहदरी गावाजवळ दुचाकीस्वारावर चाकूने वार करीत त्याच्याकडील सुमारे साडे ७ लाख रुपये लूटल्याचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी (ता.२९) महामार्गावरील या लूटीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सागर नंदू चौधरी (वय ३२, पळसे) रेडियन्ड कंपनीच्या पुणे शाखेत कॅश एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे.

कंपनीचे सिन्नर तालुक्याचे क्षेत्र आहे. शहर व ग्रामीण भागातून मॉल व अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या कडील रोजची जमा होणारी रोकड व चेक बँकेत भरणा करण्यासाठी कंपनीसोबत करार केलेला आहे. चौधरी हे तालुक्यातील व्यावसायिकांकडून रोजची जमा होणारी रोकड व चेक जमा करून नाशिक येथील बँकेत जमा करण्याचे काम करतात.

पाळत ठेउन हल्ला

आज सोमवारी नेहमीप्रमाणे जमलेली ७ लाख ५३ हजार ४१६ रुपयांची रोकड, धनादेश घेऊन दुचाकीने दुपारी नाशिकला जात होते. मोहदरी गावाजवळील गतीरोधकाजवळ त्यांच्या पाठीमागून नंबर नसलेल्या दोन दुचाकीवरील सहा अनोळखी लुटारूपैकी एका दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याने सागर चौधरी यांच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केले. (latest marathi news)

चौधरी यांनी त्यांची दुचाकी थांबवली असता दोन्ही दुचाकीवरील सहा लुटारुनी त्यांच्याकडील हॉकी स्टिकने तसेच लाथा बुक्क्यांनी चौधरी यांच्यावर थेट हल्ला केला.मारहाणीत त्यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावून तेथून पळ काढला.

काही वेळातच हल्ला करीत रोकड लांबविल्याचा हा प्रकार लक्षात आल्यावर जखमी चौधरी यांनी आरडाओरड करीत परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी जखमी चौधरी यांना रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा अनोळखी लुटारूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक यशवंत बाविस्कर तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

Latest Marathi News Updates : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात तीन शाळकरी मुलांच्या हत्येचा प्रयत्न; एकजण ताब्यात

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

SCROLL FOR NEXT