मालेगाव : येथील नवीन आझादनगर भागात दुचाकी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारी व गोळीबारात झाले. यात एकजण जखमी झाला. आझादनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. गुरुवारी (ता. २७) पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. (Shooting at Malegaon due to money dispute)
दरम्यान, या घटनेने मालेगावात खुलेआमपणे गावठी कट्टा बाळगला जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फय्याज अली कमर अली (वय ३२) हा जुन्या दुचाकी खरेदी-विक्रीचा व्यवहार करतो. शेख इलियासने फय्याजला दुचाकी विक्रीस दिली होती. त्या व्यवहारापोटी ५० हजार रुपये येणे बाकी होते. फय्याजने इलियासला पैसे दिले नाहीत.
या रागातून त्याला ठार मारण्यासाठी इलियासने त्याचा साथीदार मोहम्मद साजिद, मोहम्मद माजीद (तिघे रा. नुमानीनगर), हम्माद मलीक (रा. सनाउल्लानगर), रशीद मॉडेल (रा. फिरदोसगंज) व अनोळखी अशा सहा जणांना बोलावून फय्याजला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. फय्याजचा मित्र सय्यद रशीद ऊर्फ बाटा हा भांडण सोडविण्यासाठी आला.
मोहम्मद माजीदने त्याच्या कमरेला लावलेल्या गावठी कट्टा रशीद बाटाच्या दिशेने रोखला. ‘तू हमारे झगडेमे पडता है, पहले तुमको खत्म करता है’, असे बोलून फायर करणार तेवढ्यात राशीदने माजीदचा हात पकडून बाजूला केले, मात्र मोहम्मद साजिद याच्या डाव्या हाताला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. (latest marathi news)
याबाबत दुसरी तक्रार अम्माद अन्सारी यांनी पोलिसांत दिली आहे. इलियासचे फय्याज अली याच्याकडे ९० हजार रुपये घेणे बाकी आहे. इलियासने त्याच्या साथीदाराला पैसे काढण्यासाठी मदत करा, असे बोलून ते फय्याजकडे गेले. इलियासला सय्यद राशीद सय्यद रफीक याने शिवीगाळ केली. तसेच सय्यद अश्रफ.
फय्याज अली, शकील अहमद (सर्व रा. आझादनगर) व अन्य दोन ते तीन साथीदार दांडके घेऊन आले. अश्रफने अम्माद रयतउल्ला अन्सारी याच्या खांद्यावर, छातीवर कटरने मारून दुखापत केली. शकील अहमदने लाकडी दांडक्याने माजिदला डोक्यावर, पायावर मारून गंभीर दुखापत केली. आझादनगर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.