crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरातून 2 रिक्षा, 4 दुचाक्या चोरीला; वाहनचोरट्यांचा सुळसुळाट कायम

Nashik Crime : शहर परिसरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट कायम आहे. उपनगरीय परिसरातून चोरट्यांनी दोन प्रवासी रिक्षासह चार दुचाक्या अशी सहा वाहने चोरून नेली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर परिसरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट कायम आहे. उपनगरीय परिसरातून चोरट्यांनी दोन प्रवासी रिक्षासह चार दुचाक्या अशी सहा वाहने चोरून नेली आहेत. पोलिसांकडून स्टॉप अॅण्ड सर्च मोहीम केली जात असताना वाहने चोरीला जात आहेत. याबाबत वाहनमालकांमध्ये असुरक्षितेची भावना असून वाहनचोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी होते आहे. (Stealing 2 rickshaw 4 two wheelers from city )

रमजान तांबोळी (रा. विहितगाव) यांनी त्यांची ३० हजारांची रिक्षा ( एमएच १५ एके ५१४६) मुजीफ मनियार (रा. संताजीनगर, बजरंगवाडी) यांना प्रवासी वाहतुकीसाठी चालविण्यास दिलेली होती. गेल्या २८ जुलै रोजी मध्यरात्री ही रिक्षा संताजीनगर येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, नंदा विजय गोवर्धने (रा. श्री श्रद्धा अपार्टमेंट, इंदिरानगर) यांची ५० हजारांची प्रवासी रिक्षा (एमएच १५ झेड २१०३) गेल्या २२ जून राजी पहाटेच्या ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मखमलाबाद येथील शहाजी चौकातून १५ हजारांची दुचाकी चोरीला गेली. गणपत सीताराम मते (रा. शहाजी चौक, पिंगळे गल्ली, मखमलाबाद) यांची दुचाकी (एमएच १५ एफए २४९८) १० जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन टोपले (रा. शिवाजीनगर, गंगापूर शिवार) याची ५० हजारंची दुचाकी (एमएच १५ जेबी ४१७५) २ तारखेला मध्यरात्री राहत्या बंगल्यासमोर पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर पाटील (रा. पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक) यांची ३० हजारांची दुचाकी (एमएच १५ एफएक्स ०२९२) २१ ते २४ तारखेदरम्यान नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथील राजेंद्र एन्टरप्रायजेसच्या पे ॲण्ड पार्क वाहनतळ येथे पार्क केलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली देवेंद्र पाटील (रा. ज्योतलक्ष्मी अपार्टमेंट, बोराडे मळा, जेलरोड) यांची १५ हजारांची मोपेड ॲक्टीवा (एमएच ४१ एएन ९८२१) गेल्या शनिवारी (ता. ३) मध्यरात्री राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT