Suspect arrested in suburban fatal shooting. A team from Unit Two of the City Crime Branch along with esakal
नाशिक

Nashik Crime News : प्राणघातक हल्ल्यातील संशयिताला अटक; गुन्हेशाखा युनिट दोनची कामगिरी

Nashik Crime : जेलरोड परिसरातील सम्राट चौकात प्राणघातक हल्ल्यातला पसार झालेल्या संशयितास शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जेलरोड परिसरातील सम्राट चौकात प्राणघातक हल्ल्यातला पसार झालेल्या संशयितास शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. प्रदीप उर्फ सोनू सोमनाथ कापसे (२८, रा. पहाडी बाबा झोपडपट्टी, एकलहरा, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. (Nashik Crime Suspect arrested by police marathi news)

गेल्या १६ फेब्रुवारी रोजी जेलरोडच्या भीमनगरमधील सम्राट चौकात संशयित विजय सरजित बहेनवाल उर्फ छग्गा (रा. फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड), राहुल उज्जैनवाल (रा. फर्नांडिसवाडी), गणेश सोनवणे (रा. नारायण बापूनगर) यांच्यासह आणखी तिघांनी मयूर विजय रोहम (रा. उत्सव विहार अपार्टमेंट, नालंदा सोसायटी, जेलरोड) याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

या घटनेपासून संशयित कापसे फरार होता. दरम्यान, युनिट एकचे अंमलदार प्रकाश भालेराव यांना संशयित कापसे यांची खबर मिळाली होती. त्यानुसार युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून संशयित सोनू कापसे यास एकलहरे परिसरातून शिताफीने सापळा रचून अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार, सहायक निरीक्षक सचिन जाधव, बाळू शेळके, शंकर काळे, प्रकाश भालेराव, सुनील आहेर, प्रवीण वानखेडे यांनी कामगिरी बजावली. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT